ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

परतुर येथे मोर्चा काढून भूमिहीन मजुरांचा तहसील कार्यालयावर घेराव

October 13, 202114:15 PM 52 0 0

 दि १२ आक्टोबर २०२१ रोजी परतुर तहसील कार्यालयावर भूमिहीन शेतमजूरांचा जोरदार मोर्चा काढण्यात आला, मोर्चाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, मोर्चा थेट तहसील कार्यालयाच्या मेन गेटला धडकला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतातील पिके अतिवृष्टीमुळे पुर्णपणे पिके नष्ट झाली आहेत.म्हणून शेतकरी अडचणीत सापडले आहेत,पिके नष्ट झाल्यामुळे भूमिहीन शेतमजूराच्या हातचे काम सुध्दा नष्ट झाले आहेत,म्हणून आज भूमिहीन शेतमजूरारवर बेरोजगारी कोसळली आहे, हातात पैसा नसल्याने दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे.म्हणून कुपोषण व उपासमारीची वेळ आली आहे.

जमीन नसल्याने उपेक्षित जीवन जगावे लागत आहे,जमीन मालक साधे चूल पेटवायला सरपण घेऊदेत नाहीत, शेळी मेंढीला गवत चारा कोणी घेऊदेत नाही,तुटपुंज्या मजुरीवर जीवन कसेबसे जगत आहोत भारत स्वतंत्र झाला परंतु आजही भूमिहीन मजुराला गुलामीत जीवन जगावे लागत आहे,जगण्यासाठी किमानवेतन मिळत नाही किंवा अतिवृष्टी,कोरडा दुष्काळ अश्या अनेक अडचणी च्या काळात शासकीय कोणतीच मदत मिळत नाही.अनेक वर्षापासून राज्य सरकारने वेतनाची पुनर्रचना केली नाही.जमीन वाटपाचा कायदा झाला परंतु अमलबजावणी होताना दिसत नाही,मनरेगा च्या कामाठी अनेक वेळा पाठपुरावा करून कामे मिळत नाहीत,जगावे कसे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,वाढती महागाईच्या काळात दैनदिन खर्च दवाखाना शिक्षण अश्या अनेक अडचणी ला सामोरे जावे लागत आहे. आज गोडतेल १६० रु कीलो झाले आहे, सर्वच जिवन आवश्यक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत, दवाखान्याने पुर्ण कंबरडे मोडले आहे, म्हातारी माणसांना पेन्शन मिळत नाही, म्हणून भिक्षा मागून जगण्याची वेळ आली आहे. शहर झाडण्यापासुन ते बिल्डींग बांधण्या पर्यंत चे सर्वच काम भूमिहीन करतात, परंतु त्यांना कुठलाच सन्मान मिळत नाही, व किमान वेतन मिळत नाही. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शेतमजूर युनियन च्या वतीने आंदोलन करण्यात आले. जर सरकारने आमच्या भूमिहीन मजुरांच्या मागण्या सोडवल्या नाही तर येणार्‍या काळात तिव्र आंदोलन महाराष्ट्रात करण्यात येईल.
मोर्चातील मागण्या
१) भूमिहीन कुटुंबाना अतिवृष्टीची श्रमनुकसान भरपाई देऊन १२ हजार रु.सन्मान धन वाटप करा .
२) भूमिहीन कुटुंबाना कसण्यासाठी जमीन द्या
३) भूमिहीन कुटुंबाना घर द्या,घरासाठी घरासाठी जमीन द्या.
४) किमान वेतनाची पुनर्रचना करून शिक्षण व दवाखाना मोफत द्या
५) भूमिहीन कुटुंबाला २१ हजाराचे उत्पन्न प्रमाणपत्र द्या
६) प्रत्येक गावात मनरेगा चा सेल्प निर्माण करून,२०० दिवस काम व ६०० रु रोज द्या.
मोर्चाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष कॉम्रेड मारोती खंदारे, सरिता शर्मा,भगवान कोळे, अशोक साळवे, दत्ता कांडुरे महादेव गुंजकर हनुमान नवघरे शे. मुमताज, रवि भदर्गे यौगेश खंडागळे अशोक खंडागळे हरिभाऊ मोरे, शे. अफरोज रामा वाहुळे संगिता गीरी आकाश भदर्गे, इत्यादी महीला पुरूष हाजर होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *