आई! बसलीस गडावर
खाली तळमळते तुझी पोरं ।।धृ.।।
तुझ्या दर्शनाची ओढ फार
आले सोडूनिया घरदार
परि दिसे सर्व अंधकार…खाली…
मोह मायेचं सासर
कधी भेटेना माहेर
मी झाले फार आतुर…खाली….
माझी कृपाळु रेणुका माता
हात घालून माझ्या हाता
गड चढविते भरभर… खाली….
लेक माया माहुरा आली
दर्शन घेऊन तृप्त झाली
करी कृपेचा आहेर…
खाली तळमळते तुझी पोर…
हे भजन माझ्या “माया भजनसंध्या” या भक्तीगीतांच्या पुस्तकातील आहे.
माया तळणकर नांदेड.
९३२५०२८३७
Leave a Reply