ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

२०२२ चे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर

February 16, 202214:35 PM 32 0 0

नांदेड – माता रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने सन २०२२ या वर्षीचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यात रत्नमाला भावे, तारामती आऊलवार, रोहिणी एंगडे, सूर्यकांता धोत्रे, कांताबाई मस्के, सोनाबाई सोनकांबळे आणि मायाबाई गोडबोले यांची निवड करण्यात आली असल्याचे संयोजक आनंद गोडबोले यांनी कळविले आहे.
माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय व प्रेरणादायी जीवनाचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या आदर्श माता, पत्नी, कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी जवळा देशमुख येथे माता रमाई गणगोत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. माघ पौर्णिमा व १२४ व्या रमाई जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी, शुक्रवारी सकाळी १०.३० वा. पौर्णिमोत्सव आणि धम्मदेसना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते धम्मपाल, आंबेडकरी विचारवंत डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवळा येथील रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या रुक्मिणीबाई गोडबोले, गिरजाबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोले, वैशाली गोडबोले, संगिता गोडबोले, मिनाक्षी गोडबोले, आकांक्षा गोडबोले, प्रियंका गोडबोले, छाया गोडबोले, विद्या गोडबोले, शितल गोडबोले या पुढाकार घेत असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पांडूरंग गोडबोले, रावण गोडबोले, पुरभाजी गोडबोले, रमेश गोडबोले, कैलास गोडबोले, विलास गोडबोले, आनंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, विनोद गोडबोले, वैभव गोडबोले, विशाल गोडबोले यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *