जालना- तालुक्यातील रामनगर (सा.का.) येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी उपस्थितांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना विशाल साळवे म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ यांंचे कार्य हे देशासाठी अनमोल असून त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील कांबळे ,समता विधार्थी आघाडीचे विशाल साळवे ,हिकमत दादा उढाण प्रतिष्ठानचे गजानन बरडे ,गणेश डोंगरे ,गैबीनाथ चापायतकर ,उमेश सानप यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply