ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यातील वीर जवान सचिन काटे यांचे वीरमरण जिल्ह्यात शोककळा

October 25, 202113:39 PM 10 0 0

सातारा ,(विदया निकाळजे) : माण तालुक्यातील संभूखेड येथील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४ ) यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. या बाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी माण तालुक्यातील संभूखेड गावचे सुपुत्र पाच वर्षापुर्वी भारतीय सेनेत पाच वर्षापुर्वी भर्ती होऊन देशसेवा बजावत होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्यात दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची मुले दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी लष्करात भर्ती होऊन देशसेवा बजावण्यासाठी प्राधान्य देत असतात.


यापैकी माण तालुक्यातील संभूखेड येथील शेतकरी विश्वनाथ काटे यांचे दोन्ही सुपुत्र लष्करात भर्ती होऊन देशसेवा बजावत होते. वीर जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४) हे पाच वर्षापुर्वी इंडियन आर्मी मध्ये भर्ती होऊन राजस्थान येथे देशसेवा बजावत होते. त्यांचाच रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे. बुधवारी दि.२० ऑक्टोबर रोजी रात्री सचिन विश्वनाथ काटे हे देशसेवा बजावत असताना राजस्थान मध्ये वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिट ने दिली असून सध्या वीर जवान सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथे लष्कराचे जवान घेऊन येत असून,आज शनिवार दि.२२ऑक्टोबर रोजी संभूखेड या जन्म गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान या घटनेची माहिती समजताच माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार सूर्यकांत येवले , यांनी पोलिसांबरोबर संभूखेड येथे आज भेट दिली आहे. वीर जवान सचिन काटे यांचे आई वडिल हे गावी शेती करत असून लहान भाऊ रेवन हा आसाम येथे देशसेवा बजावत आहे. सचिन काटे यांच्या वीर मरणाची बातमीने माण तालुक्यासह संभूखेड गावा मध्ये शोककळा पसरली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *