ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध मागण्यासाठी आंदोलन

April 10, 202216:27 PM 40 0 4

पुणे (राजकिरण लिहिणार ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यापीठाचा गलथान कारभार, परिक्षेसाठी होणारी दिरंगाई तसेच ऑनलाइन परीक्षा घ्यावी अशा विविध मागण्यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यापीठ अध्यक्ष ओंकार बेनके म्हणाले की पूर्ण सत्र ऑनलाइन शिकविण्यात आले फक्त दोनच महिने ऑफलाइन क्लास झाले.मग विद्यापीठ ऑफलाइन परीक्षेचा हट्ट का धरत आहे असा खडा सवाल त्यांनी केला. तसेच या मागण्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसात उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन या मागण्या आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहोत असंही बेनके पुढे बोलताना म्हणाले.
यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाने, प्रदेश सरचिटणीस सोमनाथ लोहार, विक्रम जाधव – शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर, शुभम माताळे- कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर, यश कुलकर्णी – कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर पुणे विद्यापीठ अध्यक्ष ओंकार बेनके व पुणे शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष व मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *