ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पनवेल मि. क्लास सोसायटीतील आदर्श म. मंडळाने 38 वर्षांची हळदीकुंकूची परंपरा जपली

January 29, 202213:08 PM 48 0 0

पनवेल  ( छाया म्हात्रे ) : हळदी कुंकू म्हणजे प्रत्येक स्त्रियांना हवाहवासा वाटणारा सुवाशिणी स्त्रियांचा आणि मुलींचा अनमोल दागिना. हिंदू संस्कृतीत स्त्रियांनी कपाळी कुंकू लावणे व मळवट भरणे ह्याला खूप मोठे मानाचे स्थान आहे. मग ती स्त्री विवाहित असो वा कुमारिका तिचे कुंकू हे मानाचे स्थान आहे. तिने कपाळी कुंकू लावू दे अगर टिकली तिचे सौंदर्य त्याच क्षणी खुलून येते. तारखेनुसार येणारा जानेवारी महिना आणि तिथीनुसार येणारा पौष महिना. या महिन्याच्या १४ तारखेला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि त्याच अनुषंगाने स्त्रियांची हौसेने चाललेली लगबग. नभांगणात सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे आणि सूर्याचे उत्तरायण प्रारंभ होणे. आणि तिळातिळाने दिवस मोठा होत जाणे. मकरसंक्रांत ते रथसप्तमी पर्यंत स्त्रियांची चाललेली धामधूम. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळ देणे व स्त्रियांना हळदीकुंकू देऊन जीवनोपयोगी वस्तू वाण म्हणून देणे ही प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.
पनवेल मधील मिडल क्लास हाउसिंग सोसायटी मधील आदर्श महिला मंडळाने गेली अडतीस वर्षांची मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकूची ही परंपरा जपली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू होणे ही या मंडळाची विशेष खासियत आहे. गेली 38 वर्षे हे हळदीकुंकू या मंडळात होत आलेले आहे. कोरोना या जीवघेण्या संसर्गामुळे निर्बंध आले होते. परंतु या वर्षी हळदीकुंकू कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून व सुरक्षित अंतर राखून समारंभ अगदी उत्साहाने साजरे झाले.
मंडळातल्या महिला पारंपारिक वेशभूषा करून आल्या होत्या. एकमेकींना हळदीकुंकू आणि तीळगूळ देऊन सोबत सवाष्ण वाण देऊन एकमेकींचे आदरातिथ्य केले. त्यामुळे मंडळात यावर्षी उत्साहाचे वातावरण होते. सुमेधा, संध्या या महिलांनी गाणी गायली आणि वर्षा वाणीने एका गाण्यावर नृत्य सादर केले. आणि रूपा, छाया रंजना यांनी उखाणे घेतले. त्यामुळे उत्तरोत्तर कार्यक्रमाची शोभा वाढत गेली. मंडळातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. सौ. छाया म्हात्रे यांनी हलक्या फुलक्या शब्दांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे हळदीकुंकू समारंभ उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *