ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महावितरणचे अभियंता शकील एम खाटीक यांची दहशत आदिवासी बांधवांना ठेवले ३५ तास अंधारात

October 30, 202113:56 PM 43 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील चिरनेर महावितरण कार्यालयातील उप अभियंता शकील एम खाटीक यांनी आपल्या पदभारांचा गैरवापर करून चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल येथील आदिवासी बांधवांना ३५ तास अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले आहे.त्यामूळे अशा उर्मट, बेजबाबदार अभियंत्यावर कारवाई करावी आणि केळाचामाल येथील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू करावा अशी मागणी आदिवासी बांधवानी महावितरण कार्यालय उरणचे अति कार्यकारी अभियंता विजय सोनावणे यांच्या कडे केली. चिरनेर केळाचामाल येथील आदिवासी बांधव राम पांडुरंग कातकरी यांनी माहिती देताना सांगितले की,केळाचामाल येथील आदिवासी वाडीवर २५ कुटुंब आपल्या कुटुंबासह गेली अनेक वर्षे वास्तव करत आहेत.देशाच्या ६५ व्या स्वातंत्र्य वर्षी आम्हा आदिवासी बांधवांना महावितरण कार्यालय उरणच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात आला.परंतु चिरनेर महावितरण कार्यालयातील उप अभियंता शकील एम खाटीक यांनी आदिवासी बांधवांसाठी करण्यात आलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी तात्काळ विद्युत पोल,डि.पी.उपलब्ध करुन न देता.विद्युत वाहक तारा झाडांना टांगून ठेवत आदिवासी बांधवांना विद्युत पुरवठा सुरू केला.


सदर झाडांना टांगून ठेवण्यात आलेल्या विद्युत वाहक तारा मुळे आम्हा आदिवासी बांधवांच्या मूलांना १५ आँगस्ट २०२१ रोजी शाँक लागण्याची घटना घडली.यासंदर्भात उरण येथील महावितरण कार्यालयाकडे सदर घटनेसंदर्भात,नवीन पोल,डि.पी.बसवून मिळावी अशी मागणी केली.तसेच उप अभियंता शकील एम खाटीक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीचा राग अंगी बाळगलेले उर्मट व कार्याशी बेजबाबदार असणारे उप अभियंता शकील एम खाटीक हे जाणून बुजून आम्हा आदिवासी बांधवांना नाहक माणसीक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यात गुरुवार दि २८ आँक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठिक ९ वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा शुक्रवार दि २९ आँक्टोबर रोजी सकाळी ठिक ११ वाजेपर्यंत सुरू न झाल्याने आम्ही आदिवासी बांधवांनी चिरनेर महावितरण कार्यालयाकडील कर्मचारी वर्गाकडे तक्रार केली.
चिरनेर महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आमचे अधिकारी खाटीक साहेब बोलले तर विद्युत पुरवठा सुरू होईल.त्यामूळे केळाचामाल येथील आदिवासी बांधवांनी उप अभियंता शकील एम खाटीक यांना खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली.खाटीक साहेबांनी सांगितले की तूम्ही बिले भरा मग विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल.परंतु आम्ही आदिवासी बांधव न चूकता विद्युत बिल भरत असतानाही आमच्यावर आदिवासी म्हणून हा अन्याय का असा सवाल उरण महावितरण कार्यालयातील अति कार्यकारी अभियंता विजय सोनावणे यांना विचारणा केली असता,त्यांनी उप अभियंता शकील एम खाटीक यांची पाठराखण करत आम्हा आदिवासी बांधवांना अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम हाती घेतले आहे.त्यामूळे आदिवासी बांधवांनी आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उरणातील आदिवासी बांधव राज्यातील ठाकरे,पवार सरकारला विचारत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *