ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महावितरणच्या दामिनीने पकडली 9 लाखांची वीजचोरी; एमआयडीसी परिसरातील श्री गिरीराज पेपर्सवर कारवाई, महिला अभियंत्याची दबंग कामगिरी

August 29, 202114:46 PM 44 0 0

नांदेड(प्रतिनिधी रूचिरा बेटकर)- एमआयडीसी परिसरातील वीजग्राहकांच्या वीजवापराची तपासणी करत असताना श्री गिरीराज पेपर्स मध्ये चोरून वीज वापरल्याचे उघड झाले. एमआयडीसी उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती शोभा पिलंगवाड यांनी टाकलेल्या धाडीत श्री गिरीराज पेपर्स या उदयोगाने तब्बल 72 हजार 153 युनीट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

 

वीजकायदा 2003 च्या कलम 135 अन्वये कारवाई करत युनिटचे मुल्य व दंडाची रक्कम असे एकत्रीत 9 लाख 31 हजार 730 रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश मिळाले आहे.
वीजगळतीला लगाम घालण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या घरगुती वीजग्राहकांवर कारवाई केली जात असून सोबतच वीजवापरात अनियमीतता आढळणाऱ्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांवरही मोठया प्रमाणावर कारवाई केली जात आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या निर्देशानुसार नांदेड शहरामध्ये मोठया प्रमाणावर वीजचोरी विरोधात विविध पथकांद्वारे मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता शोभा पिलंगवाड यांनी दबंग कारवाई करत दि.18 ऑगस्ट रोजी श्री गिरीराज पेपर्स या उद्योगाच्या वीजवापराची तपासणी केली. यामध्ये 20 एचपीचा मंजूर भार असतानाही मीटरवरील वापर हा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे श्रीमती पिलंगवाड यांनी सहायक अभियंता प्रशांत थोरात, सचिन कल्याणकर, प्रधान तंत्रज्ञ शेख नसीर, तंत्रज्ञ बालाजी मुदगुरे व उच्चस्तर लिपीक संतोष दराडे यांना सोबत घेवून सखोल तपासणी केली असता श्री गिरीराज पेपर्स हे त्यांच्या मीटरला जाणाऱ्या इनकमींग केबलला दुसरी जादा केबल जोडून अनधिकृतरित्या केबलवरुन वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. या तपासणीत 40 एचपीचा अनधिकृत वापर झाल्याचे आढळून आले.
वीजचोरांविरोधात गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई करण्याचे श्रेय महावितरणच्या दामिनी श्रीमती शोभा पिलंगवाड यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाले आहे. एका महिला अधिकाऱ्यांने पुढाकार घेत वीजचोरांविरोधात केलेली दबंग कारवाई कौतूकास्पद ठरत आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई करणार असल्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त करत केवळ कारवाई नकरता श्री गिरीराज पेपर्स कडून चोरलेल्या विजेच्या युनिटचे व दंडाची रक्कम असे एकत्रीत 9 लाख 31 हजार 730 रुपयांची वसुलीही केली आहे.
परिमंडळातील नांदेड, परभणी व हिंगोली या तीनही जिल्हयातील सर्व उपविभागा अंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये त्याचबरोबर वीजचोरुन वापरणाऱ्या औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांवर वीजकायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या मोहीमेत अडथळा आणणाऱ्या वीजचोरांविरोधात प्रसंगी गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *