ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुद्रा साहित्य संस्थेच्या वतीने आदर्श विधिज्ञ व आदर्श शिक्षकांचा गौरव; समाजाचा घटक म्हणून वकिलांनी काम करावे- गुजराथी

December 14, 202016:12 PM 30 0 0

जालना मुद्रा साहित्य संस्थेच्या वतीने शनिवारी ( दि.12) सायंकाळी सहा वाजता शहरातील कृष्णा आर्केड येथे जागृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या हस्ते विधिज्ञ व आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. रमेश देहेडकर यांची उपस्थिती होती.

संविधान दिनानिमित्त तसेच मोरेश्वर अंबादास अंभोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद येथील ऍड. पुष्पक गुजराथी, नाशिक येथील ऍड. मनीषा मंडलिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना वकील श्री. गुजराथी यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करतांना आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त केली. समाजाचा घटक म्हणून वकिलांनी काम करावे, त्याचे अधिक समाधान मिळते. मुद्रा संस्थेने सत्कार केल्याने माझी जबाबदारी वाढली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. साहित्य संस्थेचे व कुटुंबाचे आभार यावेळी मनीषा मंडलिक यांनी व्यक्त केले. तसेच महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त बदनापूर येथील शिक्षक परमेश्वर बोरुडे, तर जालना येथील शिक्षिका प्रतिभा श्रीपत यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत रडगाणे गाणे सोडून द्यावे. उपलब्ध साधनांचा वापर करून विदयार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे. कोव्हिडमुळे विद्यार्थ्यांसाठी काही करता येत नसल्याची खंत यावेळी शिक्षक श्री.बोरुडे यांनी मांडली. हा पुरस्कार पाठीवर कौतुकाची थाप देणारा असल्याची भावना यावेळी शिक्षिका प्रतिभा श्रीपत यांनी व्यक्त केली.

यावेळी आयोजित कविसंमेलनात प्रा. शशिकांत शिंदे व संदीप काळे यांनी आपल्या विविधांगी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीधर अंभोरे, डॉ. राजेंद्र गाडेकर, इंजि. संजय कसबे, कैलास भाले यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर , प्राचार्या अपर्णा पवार,श्रीमती काबरा, भागवत कराडकर,सुभाष पवार , पंढरीनाथ सारखे, मनीष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी कैलास भाले यांनी केले. प्रा.ज्योती पोहेकर आणि प्रा. चारुशीला दाभाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. पंढरीनाथ सारके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी शांतीलाल बनसोडे, पी. पी. वाघ, इलियास मोहिनोद्दीन, विठ्ठल वरपे, किरण कांबळे, नवनाथ लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *