*कढीपत्ता*
कढीपत्ता निरोगी आरोग्यासाठी कढीपत्ता बहुगुणी आहे.
कढीपत्ता याची पाने जशी जेवणाची चव वाढवतात. तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
१) कढीपत्ता मध्ये विटामिन A,B,C मुबलक प्रमाणात असल्यामुळे केसांचे व त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवतात.
२) दोन चमचा कढीपत्त्याचा रस एक कप ताकातून जेवणानंतर पिल्याने अन्न व्यवस्थित पचन होते. अपचन सारख्या तक्रारी निघून जातात.
३) रोज सकाळी एक ते दोन चमचे कढीपत्त्याचा रस पिऊन वरून एक कप कोमट पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहते. हृदयाची कार्य सुरळीत चालते.
४) कमी वयामध्ये पांढरे झालेले डोक्याचे केस काळे करण्यासाठी रोज सकाळी आंघोळीच्या आधी अर्धी वाटी कढीपत्त्याची चटणी डोक्याला लावावी. तीस मिनिटांनी आंघोळ करावी. त्याच बरोबर रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 चमचे कढीपत्त्याचा रस प्यावा.वरून एक कप कोमट पाणी प्यावे.
५) गॅसेस पित्त व अपचन यांच्या वारंवार तक्रार होत असतील. रोज सकाळी उपाशी पोटी दोन चमचे कढीपत्त्याचा रस पिऊन,वरून एक कप कोमट पाणी प्यावे.
६) एक चमचा कढीपत्त्याचा रस व एक चमचा मध एकत्र करून सकाळी उपाशीपोटी पिल्याने आर्यन ॲनिमिया कॅल्शियम सारखे तक्रारी लवकरच दूर होतात.
७) कढीपत्त्याचा व कांद्याचा रस दोन्ही मिळून अर्धी वाटी काढावा, सकाळी आंघोळीच्या आधी तीस मिनिटे केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावी. ३० मिनिटानंतर आंघोळ करावी. केसातील कोंडा निघून जातो,केस गळती कमी होते,केस मुलायम होतात, केसांना चमक निर्माण होते.
८) दहा-पंधरा कढीपत्त्याची पाने यांची चटणी बनवून,व अर्धा चमचा जिरे पावडर दोन्ही मिळून तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळा,व एक कप झाल्यावर गाळून घेऊन सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे बॉडीचे मेटाबोलिक वाढून वजन कमी होण्यास मदत होते.
९) रोज सकाळी एक-दोन चमचे कढीपत्त्याचा रस काढून प्यावा, किंवा आहारात नियमित कडीपत्त्याचे पाने वापरल्याने, यकृताच्या तक्रारी निघून जातात.
१०) रोज सकाळी कडीपत्त्याचे चार-पाच पाने खाऊन वरून एक कप कोमट पाणी पिल्याने. मधुमेह नियंत्रणात राहतो.
आहारामध्ये नियमित कडीपत्ता सारखे औषधी गुण असलेल्या वनस्पतींचा वापर करा. अन्नाची चव वाढवा व आरोग्य निरोगी आणि आनंदी जागा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*साई सिद्धी पंचकर्म सेंटर*
आमच्या पंचकर्म केंद्रात लट्टपणा, डायबेटिस, दमा,ब्लड प्रेशर, सांधेदुखी,कावीळ, मूळव्याध, मुतखडा, वंद्यत्व, त्वचाविकार या आजारावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार केले जातात.
*डॉ शिवाजी काळेल* (MD.BAMS) .
शिवाजीनगर, गोवंडी. मुंबई 400043
*मोबाईल :9594880380
Leave a Reply