मुंबई : विलेपार्ले परिसरात २३ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पोलिसांनी दोन कचरावेचकांना अटक केली आहे.
जमील अहमद अन्सारी (४५) आणि रितेश विलास मारू (३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी जिगर नावाच्या तरुणाची हत्या केली होती. जिगर हा व्यसनांच्या आहारी गेला होता. विलेपार्ले पूर्वेला एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तो नशेत पडला होता. त्याच ठिकाणी जमील आणि रितेश राहत होते. जिगरने त्यांना शिवीगाळ सुरू केली. याचा राग आल्याने दोघांनी लाकडी ठोकळा डोक्यात मारून जिगरची हत्या केली आणि पळ काढला होता.
Leave a Reply