ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर ; कार्यकत्र्यांनी कामाला लागावे – माजीमंत्री अर्जुनराव खोतकर

August 30, 202114:57 PM 54 0 0

जालना, दि. २९(प्रतिनिधी)-जालना नगर परिषदेतील सत्ताधाNयांनी मागील दहा वर्षांपासून जालना शहराची दयनिय अवस्था करुन ठेवली आहे. शहरातील सद्यस्थितीत एकही रस्ता धड नाही. त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी कामाला लागण्याचे आवाहन माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले. नगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जालना येथे नगर परिषदेचे आजी-माजी सदस्य यांची बैठक माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कररराव अंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करतांना माजीमंत्री अर्जुनराव खोतकर बोलत होते.

यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर, अ‍ॅड. सुनिल किनगावकर, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख आत्मानंद भक्त, बाबुराव पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकारी व कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करतांना माजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जालना नगर परिषदेची निवडणुक तोंडावर आली असून जालना शहरातील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाNयांनी झटून कामाला लागावे. शिवसेनेच्या कार्य काळात झालेली कामे लोकांच्या नजरेस आणून द्यावीत तसेच दहा वर्षांच्या कालावधीत सध्याच्या सत्ताधाNयांनी शहराची पार दुर्दशा केली असून यासंबंधी त्यांना जाब विचारावा. आगामी काळात होणाNया निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत नगर परिषद ताब्यात घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, आघाडी कोणाशी होणार विंâवा नाही हे पक्षादेशानंतर स्पष्ट होईल पण त्याची कोणतीही वाट न पाहता कार्यकत्र्यांनी कामाला लागावे, असेही खोतकर म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेचे सर्व नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी आपआपल्या विभागांत सर्व पात्र मतदारांची जास्तीत-जास्त नोंदणी करुन घ्यावी. पक्षाचे संघटन मजबुत करावे त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरे जावु शकतो. शिवसेनेच्या कार्यकाळात जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेसह शहरात खुप मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यकाहात झालेली विकास कामे जनतेच्या लक्षात आणून द्यावेत. तसेच आपआपल्या वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द रहावे. पक्षासाठी या निवडणुकीत अत्यंत पोषक वातावरण असल्याचे सांगून सर्वांनी आपआपल्या वार्डात दक्ष राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केले. याच कार्यक्रमात माजी आमदार संतोष सांबरे यांनी म्हटले की, निवडणुक कोणतीही असो ती अत्यंत नियोजन पुर्वक लढणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छूक पदाधिकाNयांनी नागरिकांशी संपर्वâ वाढवून त्यांच्या ेवेळोवेळी अडअडचणी सोडविण्याचे काम करावे, या प्रमाणे कार्य केल्यास आपणास या निवडणुका सहज जिंकता येतील, असेही ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित सर्व आजी-माजी नगरसेवकांना मोकळेपणाने आपली मते व्यक्त करण्याची व सुचना मांडण्याची पुरेपुर संधी देण्यात आली.यावेळी माजी शहरप्रमुख बाला परदेशी, नगरसेवक अशोक पवार, गणेश घुगे, गोपी गोगडे, विजय पवार, किशोर पांगारकर, संतोष जांगडे, निखिल पगारे,माजी नगरसेवक विजय जाधव, पेâरोज तांबोली, जावेद शेख, जे.के. चव्हाण, महेश दुसाने, गंगुताई वानखेडे, राम सतकर,राजेश टेकुर, प्रताप वर्मा,संताजी वाघमारे, नरेश खुदभैये, दिनेश फलक,राजु माधोवाले, विजया चौधरी यांच्यासह भरत सांबरे, अमोल ठावूâर,राजु दुसाने, कमलेश खरे, संतोष परळकर, देवेंद्र बुंदले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *