ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगरपरिषद अधिकृत महिला व बालकल्याण महिला समिती व युवा महिल प्रतिष्ठान,मुरुड तर्फे ज्वेलरी व दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

December 17, 202112:44 PM 66 0 0

मुरुड जंजिरा ( नैनिता नरेश कर्णिक) :  महिला व बालकल्याण समिती मुरूड जंजिरा नगरपरिषद रायगड द्वारा महिलाकरिता कौशल्यवृष्टी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम योजने अंतर्गत युवा–महिला प्रतिष्ठान ,तर्फे अॅडवान्स ज्वेलरी व दुग्धजन्य पदार्थ बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम नगरपरिषद मुरुड नगराध्यक्षा माननीय स्नेहा पाटील (माई ) उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे मॅडम,महिला व बालकल्याण समिती मुरुड सभापती आरती श्रीकांत गुरव मॅडम,उपसभा पती प्रणाली मकू मॅडम,पर्यटन विकास सभापती युग॔धरा ठाकुर मॅडम, बांधकाम सभापती मेघाली पाटील मॅडम,नगरसेविका गटनेत्या मुग्धा जोशी,नगरपरिषद नगरसेविक अनुजा दांडेकर, युवा महिला प्रतिष्ठान;रायगड अध्यक्षा सायली सुनील धुमाळ यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण दि.३० /११ /२०२१ ते११/ १२ /२०२१या कालावधीत ज्वेलरीचे प्रशिक्षण तृप्ती नागोठकर यांनी ठुशी,तनमणी,मण्यांच्या हारांचे प्रकार प्रात्यक्षिक दाखवून वस्तूं महिला कडून करून घेतले.

दुधापासून बनणारे पदार्थ रसमलाई ,रसगुल्ले,खरवस इ. पदार्थ प्रात्यक्षिकादवारे तज्ज्ञ प्रशिक्षिका सरीता गायकवाड यांनी दिले.समारोपाच्या वेळी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना मान्यवर महिला व बाल कल्याण सभापती आरती गुरव, नगरसेविका युगंधरा ठाकुर,अनुजा दांडेकर, युवा महिला प्रतिष्ठान अध्यक्षा सायली धुमाळ सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वैशाली कासार ,छाया धुमाळ,शैलजा बागडे, दिपाली जामकर, छाया अत्रे,रूपाली मकू ,रेश्मा तनुजा गोबरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज पुलेकर ,राकेश पाटील, स्वप्नजा विरकुड, मुरूडकर नगरपरिषद कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. नगरपरिषद मुरुड तर्फे महिला व बाल कल्याण सभापती आरती गुरव,युगंधराची ठाकुर,अनुजा दांडेकर, नैनिता कर्णिक ,सायली धुमाळ यांचा.पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नैनिता कर्णिक यांनी प्रशिक्षण खूपच चांगले झाल्याचे नमूद करून महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. नगरपरिषद नगरसेविका अनुजा दांडेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर प्रप्रशिक्षणार्थी महिला संयोजक आयोजक यांचे मनःपूर्वक आभार मानून प्रशिक्षणाची सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *