ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता; आरोपी ताब्यात

August 20, 202115:07 PM 21 0 0

बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार आज कागल तालुक्यात घडला मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी मारुती वैद्य या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कागल तालुक्यातील सोनाळी गावात डॉ. रवींद्र पाटील हे राहतात. त्यांचा मुलगा आजोबांच्या घरी वास्तुशांती समारंभासाठी चार दिवसापूर्वी सावर्डे बुद्रुक या गावी गेला होता. कार्यक्रम संपल्यावर १७ ऑगस्टपासून तो बेपत्ता होता.
त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी कागल तालुक्यातील मुरगूड पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच चार दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.

कागल, कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकातही याचा शोध घेतला गेला पण तो आढळला नाही. दरम्यान, आज सकाळी सावर्डे बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने, त्याचा खून करून मृतदेह तलावात टाकला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तर, मुलगा होत नसल्याने डॉक्टरच्या मित्रांनेच हा प्रकार केल्याची माहिती देखील समोर येत आहे. मुलगा व्हावा यासाठी नरबळी देण्यासाठी हा प्रकार केल्याचीही देखील चर्चा आहे. पोलिसांनी पकडलेला आरोपी मारुती वैद्य हा डॉ. रवींद्र पाटील यांचा मित्र असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *