ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून

March 4, 202212:53 PM 94 0 0

लखनौ : सीआरपीएफ जवानाच्या बेपत्ता पत्नीचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं. विवाहितेची हत्या करुन तिचा मृतदेह कानपूरमधील नाल्यात फेकून देण्यात आल्याचं समोर आलं आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचं पोलीस तपासानंतर उघडकीस आलं आहे. भेटण्यास वारंवार नकार देत असल्याच्या रागातून तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. सीआरपीएफ जवानाच्या बायकोचा मेकॅनिकवर जीव जडला होता, मात्र प्रियकरानेच अखेर तिचा जीव घेतला.
उत्तर प्रदेशातील पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनपूर येथून बेपत्ता झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचे गूढ अखेर पोलिसांनी उलगडले. सीडीआरच्या मदतीने पोलिसांनी तिच्या माहेरच्या गावात राहणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. महिलेची हत्या केल्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह कानपूरच्या ग्रामीण भागातील शिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाल्यात फेकल्याची माहिती दिली. आरोपींनी सांगितलेल्या घटनास्थळावरुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
रतनपूर कॉलनीत राहणारा इंद्रपाल सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. 20 फेब्रुवारी रोजी तो जमालपूर, मैनपुरी येथे निवडणूक कर्तव्यावर होता. या काळात त्याने आपली 34 वर्षीय पत्नी गीता हिला अनेकदा फोन केला, तेव्हा मुलगा सुशांत म्हणाला की, पुष्पेंद्र काका आले होते. त्यानंतर मी झोपलो. मला जाग आली तेव्हा आई घरी नव्हती. त्यावर इंद्रपालने पनकी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पनकी पोलिसांना घरात बिअरचे रिकामी कॅन आणि दोन ग्लासांसह काही अश्लील वस्तू आढळून आल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पनकी पोलिसांनी कानपूर ग्रामीण भागातील रुरा हसनापूर गावचा रहिवासी मुख्तार आणि गंगागंजचा प्रॉपर्टी डीलर पुष्पेंद्र यांना सीडीआरद्वारे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

चौकशीत कार मेकॅनिक मुख्तारचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी त्यालाही उचलले. मुख्तारच्या चौकशीत त्याचे गीतासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ती भेटायला टाळाटाळ करत होती. 20 फेब्रुवारी रोजी तो त्याच्या दोन साथीदारांसह गीता यांच्या घरी तिला भेटण्यासाठी पोहोचला, तेथून तो गीताला फिरण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला होता. वाटेत त्याचा गीतासोबत वाद झाला. त्यामुळे त्याने गीताचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरुन मृतदेह ताब्यात घेतला.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *