ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा खून

January 24, 202116:51 PM 123 0 0

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक इचलकंरजीतील कबनूर या ठिकाणी घटना घडली आहे. संदीप सुरेश मागाडे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात मुख्य संशयित आरोपींमध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे दोघेही मुख्य संशयित आरोपी असल्याचे म्हटलं जात आहे. 

संदीप मागाडे हा इचलकंरजीतील कबनुरातील भीमराज भवनजवळ राहत होता. काल रात्री कामावरून परतल्यानंतर तो कबनूर चौकात डेक्कन रोडवर थांबला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्याला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

संदीप हा जखमी अवस्थेतच जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. यानंतर आझादनगर परिसरात पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठले. यावेळी तलवारीसह धारदार शस्त्राने त्याच्यावर तीक्ष्ण वार करण्यात आले. यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संदीपच्या डोक्यात, खांद्यावर सुमारे सातहून अधिक तीक्ष्ण करण्यात आले होते. तसेच हल्ला रोखताना त्याचे हातावरही वर्मी घाव बसल्याचे तपासात निष्पन्न झाले. संदीप याच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी धाव घेतली.

हल्लेखोरांनी थरारकरित्या पाठलाग करून केलेल्या या घटनेमुळे कबनुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्याची घटना कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, घटनास्थळी असलेल्या तलवारीची मूठ तुटली होती. घटनास्थळीच रक्ताने माखलेली तलवार, दगड पोलिसांना मिळून आले. तसेच एक मोपेड आणि एक मोटारसायकल अशा दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

तब्बल 19 जण संशयित आरोपी
नुकतंच कबनूर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मागाडे हा अग्रेसर होता. त्यातूनच हा खुनशी हल्ला झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्यासोबतच रवी कांबळे, रमजान सनदी, मुजफर घुणके, असिफ खताळ,मोठा शाहरुख, आकाश कांबळे, राहुल शिंदे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, रोहन कुरणे, शाहरुख, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर असे एकूण 14 जण संशयित आरोपी आहेत. त्याशिवाय अन्य 5 जणांची नावं समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान इचलकरंजी शहरात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एका गुन्ह्याचा तपास पूर्ण होता न होताच दुसरा गुन्हा पोलिसांच्या समोर वाढून ठेवलेला असतो. यातच राजकीय वादामुळे झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर परिसरास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *