ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दीड महिन्यांच्या मुलीची हत्या

December 31, 202017:13 PM 26 0 0

वसई : दोन मुलींपाठोपाठ जुळ्या मुली झाल्याने वसईतील एका महिलेने दीड महिन्याच्या मुलीला पिंपात बुडवून ठार मारले. वसईच्या पाचूबंदर येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली

वसईच्या पाचूबंदर येथे ईतूर हे मच्छिमार कुटुंबीय राहते. प्रेसिला (नाव बदलेले) इतुर या महिलेला दोन मुली होत्या. नुकतेच तिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. चारही मुली झाल्याने प्रेसिला नैराश्यात होती. बुधवारी सकाळी घरातील इतर सदस्य मासे सुकविण्यासाठी गेले असताना प्रेसिलाने दीड महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला गच्चीवरील पाण्याच्या पिंपात बुडवून ठार मारले.

मुलगी घरातून बेपत्ता असल्याचा बनाव तिने सुरवातीला केला होता. मात्र पोलीस चौकशीत तिने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. वसई पोलिसांनी प्रेसिलाला अटक केली आहे. चारही अपत्य मुली असल्याने तिने हे कृत्य केल्याचे वसई पोलिसांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *