जालना प्रतिनिधी :- उद्या सकाळी 11 :45 वा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना मुर्तीवेस शिवाजी महाराज पुतळा हा मुख्य रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या संदर्भात वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून त्या मुर्तीवेसच्या मुख्य रस्त्या खुला करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी सांगितले आहे.
अनेक दिवसांपासून शिवाजी महाराज चौक जवळचा मुर्तीवेस हा जालना शहरातील मुख्य रस्ता असून तो बंद करण्यात आला आहे, त्यामुळे जनता मंगळबाजारातून ये जा करत आहेत परंतु बाजाराच्या दिवशी त्या रस्त्याने जाने खूप अवघड झाले आहे शिवाय कोरोना नियमाचे नियम तेथे पाळणे अशक्यच आहे एवढी बाजाराची गर्दी असल्याने जनतेचे हाल होत आहेत, त्यामुळे मुर्तीवेस चे काम तातडीने संबंधित अधिकाऱ्याची बैठक घेवून तो मुख्य रस्ता खुला करण्यात यावा. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, शहर महिला, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नगरपरिषद जालना येथे सकाळी 11:45 वा उपस्थित राहवे असे अहवान जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केले आहे.
Leave a Reply