जालना (प्रतिनिधी): राम मंदिर निर्माण संकलन निधीचे कार्य संपूर्ण भारतात वेगाने चालु आहे. राम मंदिर निर्माण राष्ट्र भक्तिचे प्रतिक आहे. बेलापूर तालुका श्रीरामपुर येथील जामा मस्जिद चे मुख्य ट्रस्टी जफरभाई अत्तार बहोद्दिन सय्यद, हैदरभाई अकबर भाई टिन मेकरवाले, हाजी ईस्माईल, रफीक भाई, शफीक बागवान व इतर मुस्लिम बांधवांनी राम मंदिरचे कोषाध्यक्ष प.पु.गोवींद देवगिरीजी महाराज आणि राष्ट्रसंतचार्य किशोर व्यास यांना 44 हजार 111 रुपये राम मंदीरासाठी दान केलेे. या कार्यास राष्ट्रीय एकात्मताचे प्रतिक जनता म्हणत आहे.
असे जालना येथील मुस्लिम समुदायाने मामा चौक येथील राम मंदीर निर्माण कार्यालयाशी संपर्क साधुन दान करावे, 1 रुपया पासून ते 1 कोटी रुपयांपर्यत सर्व नागरिकांनी राम मंदिरास दान करावे, या अभियानात आपल्या अनमोल सहकार्य करावे, असे आवाहन आर्य समाजाचे अध्यक्ष पारस नंद यादव यांनी केले आहे. जालना येथील दानशुर उद्योगपती घनश्यामसेठ गोयल यांच्या कालीका गु्रपच्या वतीने 1 कोटी 8 लाख रुपये राम मंदिरास दान करण्यात आले. तसेच पित्ती परिवानाने 1 कोटी 17 लाख रुपये राम मंदिरास दान केल्याने त्यांचा जालना आर्य समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले. या दान अभियानामध्ये जालना उद्योगपती यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी आपला खारीचा वाटा ही द्यावा, तसेच कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पक्षप्रेमीकडून जास्तीत जास्त राम मंदिरास दान करावे, अशी विनंती या प्रसिध्दी पत्रकान्वये पारस नंद यादव, फिरोज चौधरी तसेच राजेश कांबळे यांनी केले आहे.
Leave a Reply