जालना प्रतिनिधी (अनिता पवार) : कोरोना काळात आपली सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकी जपण्याच्या हेतूने जालना जिल्ह्यातील शिक्षिकांनी पुढाकार घेत ,माझे योगदान व्हॉट्सॲप समूह स्थापन केला. या समूहाच्या माध्यमातून निधी जमा करून तीन ऑक्सिजन कन्संट्रेटर मशीन आणि तीन स्टाबिलायझर खरेदी केले.जालना, टेंभुर्णी आणि जाफराबाद येथील दवाखान्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन व स्टाबिलायझर वाटप केली होती.
सदरील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेतर्फे काही संबंधित शिक्षकांचा *अँटी कोविड योध्दा* म्हणून तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्या स्वाक्षरीनिशी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मंगेश जैवाळ जि.प.प्रा.शा सिंधी.काळेगाव , विकास पोथरे जि.प.प्रा.शा दाभाडी, अनिता शिंगणे प्रा शा. थार, अनिता पवार जनता हायस्कूल जालना. उषा चव्हाण,सुखदा पाटील, मनोज साळवे जि प. प्रशाला जाफराबाद ,सविता बरंडवाल जि.प.प्रा शा.जानेफळ यांचा समावेश आहे.
पंचायत समिती,जाफराबाद येथील गटशिक्षणाधिकारी श्री.सातव सर यांच्या स्वाक्षरीसह “तालुकास्तरीय कोरोना योद्धा”म्हणून उमेश दुनगहू ,मनोज साळवे, शिवाजी देशमुख यांना तालुका स्तरीय प्रतिनिधी म्हणून सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांनी कोविडं रुग्णांसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, जिल्हा प्रशासन तथा पंचायत समिती कार्यालय, जाफराबाद यांनी संबंधीत सर्व *80* शिक्षकांना सन्मानपत्रे देऊन गौरव केला.
गटशिक्षणाधिकारी डॉ सतीश सातव यांनी सर्वांचे कौतुक करून भविष्यातील समाजोपयोगी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply