आई माझा पहिला गुरू
तिच्यामुळेच जीवन सुरू
वडिल माझे दुसरे गुरू
त्यांच्याकडून संस्कार सुरू
शिक्षक माझे तिसरे गुरू
त्यांच्यामुळे शिक्षण सुरू
भाऊ माझे चौथे गुरू
त्यांच्यामुळे समजदारी सुरू
बहिणी माझ्या पाचवा गुरू
सुखदुःखाची वाटणी सुरू
सासूसासरे माझे सहावा गुरू
त्यांच्यामुळे दुनियादारी सुरू
सरुमाय परिवार माझा सातवा गुरू
जीवन जगण्याची दिशा सुरू
निसर्ग माझा आठवा गुरू
परोपकारी भावना सुरू
शेजारी माझे नववा गुरू
सहकार्याची भावना सुरू
सहकारी माझे दहावा गुरू
त्यांच्यामुळेच प्रगती सुरू
मित्रमैत्रिणी माझे अकरावा गुरू
विचारांची देवाणघेवाण सुरू
विद्यार्थी माझे बारावा गुरू
त्यांच्यामुळे यशस्वी वाटचाल सुरू
या सगळ्यांच्या प्रभावाने
मी लेखन केले सुरू
जणू मिळाला मला कल्पतरू
– सौ मंगला परेश दोरीक
18, प्रियदर्शनी काॅलनी
शहादा रोड, निमझरी नाका
शिरपूर जिल्हा धुळे
Leave a Reply