ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माझे प्रेरणास्थान -माझी आई

September 4, 202113:15 PM 106 0 6

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.बंजर जमिनीला उगविणाऱ्या गवताला सुध्दा फाटे फुटतात, तशी आपल्या आईची प्रतिमा उजवल माथेने चमकत असते. तसे मी माझ्या आईवडिलांपोटी जन्माला आले .आयुष्यच्या वळणावर कोणतरी आपल्या जीवनाचा शिल्पकार, मूर्तिकार आणि दैवत्व असते.त्याशिवाय आपले जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोचि भाळ “असे म्हटले जाते. पण देवा पेक्षा अधिक मौल्यवान अशी व्यक्ती असते ती म्हणजे खरोखरच आपले प्रेरणास्थान… ते प्रेरणास्थान म्हणजे माझी आई जिने जन्माला घातले तिने माझ्या आयुष्याला एक मौल्यवान रत्न बनवले .ती स्वतः एक शिक्षिका, चार मुलींची आई की त्या सगळ्या आपापल्या क्षेत्रात अग्रेसर कोण शिक्षिका, प्राध्यापक,आर्टिश भाऊ माण तालुक्यातील प्रगतशीर शेतकरी आणि सगळ्यांना आधार देणारी आई आधारस्तंभ आहे.

जीवनाच्या प्रत्येक मोडवर संकट असो आनंदाचा प्रसंग असो किंवा सुखदुःखाचे चटके असो अशा वेळी एक परीस म्हणून ती आमच्या भावंडांच्या पाठीशी असणारी एक झंझावाती नेतृत्व… “माझे प्रेरणास्थान”. शब्दात सामर्थ्य असणारी, कायमच गोड बोलून माणसांची मन जिंकणारे व्यक्तिमत्व ,माणुसकीचा झरा असणारे ,अस्तित्वाचा उगम असणारे आणि स्वयंप्रकाशित भावनेने आमच्या सर्व भावंडांना पाठीशी असणारा एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे माझी आई .. खरोखरच जीवनाच्या प्रसंगी सद्विचार, चौकसवृत्ती आणि सामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ गुण असणारी माझं प्रेरणास्थान, आमच्या सर्वच भावंडांना अधिकारी बनण्यापेक्षा उद्योगप्रिय ,बुद्धिमान आणि सतत विज्ञानाची कास धरायला शिकवत आली . दया हा तिचाअलौकिक गुण होता, कितीही आपण चुकत असलो तरी कायमच एक आधाराचा कंदील घेऊन आमच्या पाठीशी उभी असणारे,आम्हा सगळ्या भावंडांना तिने या समाजात मानाने जगायला शिकवले .जगत असताना येणाऱ्या प्रत्येक संकटाला धीराने तोंड दिला तिने हातभार लावला .असे प्रभावी आणि शांत मितभाषी व्यक्तिमत्व माझे प्रेरणास्थान. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य ही आपली महत्वाची जबाबदारी आहे जीवन फुलासारखे जगा, पण जीवनाच्या प्रवाहात स्वच्छंदी बनवून आपल्या मनाचा वारसा समाजोपयोगी कार्यासाठी वाहा. आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी कायम पाठीशी राहा अशी प्रेरणा देणारी आम्हा सगळ्यांना साहसाची तिलांजली देणारी माझी माऊली .. आता सध्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला वयाचे 75 वर्ष असताना तोंड देऊन धीराने संकटाला परतून लावले.. माझी आई सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते .आम्ही लहानपणापासून पाहतो की एक आदर्श शिक्षिका. गृहिणी,समाजसेवक, लोकांना बचत कशी करावी यासाठी अल्पमुदत आर डी गोळा करून गरिबीची बँक बनली होती.त्यामुळे आम्हा भावंडांना तिचा हा वारसा कायम पाठीशी आहे. ” “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,” कुणाचे ओझे” असं कधीच तिने आम्हाला घडवले नाही नीतिमत्ता ,समाजसेवा ,दुसऱ्यांच्या वाईट प्रसंगाला सतत मदत करण्याची सवय, कितीही संकट आले तरी न डगमगता त्याला तोंड देण्याचे धाडस तिने आम्हाला दिले .तिच्या मुळेच आज मी समाजात महिलांना मदत करणारी शिक्षिका ,माझ्या मुलानी आपल्या क्षेत्रात केलेली प्रगती.. सगळ्या क्षेत्रात माझ्या परीने मी कष्टाची आहुती देऊन समाजात स्थान मिळवले ते फक्त आईमुळे, माझी आईरुपी प्रेरणा असे रत्न रुपी माझे प्रेरणास्थान आहे.
” गुरू ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः।।”या उक्ती प्रमाणे आई हेच आपले गुरू मानले जाते ते शतशः खरे आहे …
वर्षा देवकर ,

ता.माण, जि. सातारा

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *