ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माझे प्रेरणास्थान

September 4, 202113:21 PM 96 0 0

मातीचा गोळा असणाऱ्या आपल्या मुलावर संस्कार करणारी माता ही प्रथम गुरु,शिक्षक असली तरी आपले जीवन जगण्यालायक करण्यासाठी आयुष्यात एखादे प्रेरणास्थान असावे लागते. माझ्या आयुष्यात मला असे एक प्रेरणास्थान मिळाले ज्यांचे आजही वेळोवेळी मला मार्गदर्शन होते.साधारणपणे एकोणासशे चौसष्ट सालापासून आज अखेर हा प्रेरणास्त्रोत वेळोवेळी माझी मरगळ काढून मला ताजेतवाने करत असतो.


हा प्रेरणास्त्रोत म्हणजे शाळेत मला संस्कृत शिकविणारे माझे घळसासी सर !
सर आमच्या शाळेत नोकरीला लागले आणि आमच्यातले गुरु शिष्य नात्याचे बंध कसे घट्ट होत गेले ते समजलेच नाही.
माझे शालेय जीवन आणि नंतरचा काही काळ फार खडतर होता. अनेक संकटांना तोंड देत मी जगत होते त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, आधार, धीर देत त्यांनी मला उभे केले. प्रेमाने चौकशी करत मदत केली.माझ्या भविष्याची काठी बनून माझ्यात विश्वास निर्माण केला. आजही, मी शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही हे सर्व चालू असून ते केवळ माझे शिक्षक नसून त्यापेक्षा बरेच काही आहेत.
सरांचाही त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक उपक्रमात सहभाग असतो.कराडमध्ये चालू असलेल्या वेदपाठशाळेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
फडके गणपति संस्थान मुंबई,’संस्कृत ज्ञानवंत’ दाजी भाटवडेकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकार महाकवी कालिदास पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी काही संस्कृत पुस्तकांचे लेखन केले आहे.संस्कृत भाषा संवर्धन प्रचारासाठी ते सदैव कार्यरत असतात.
योगायोगाने माझी मैत्रीण त्यांची पत्नी बनली आणि आमच्या गुरुशिष्य नात्याच्या रेशमी वस्त्राला मैत्रीचा जरीकाठ जोडला गेला. सरांचे घर म्हणजे मन मोकळे होणारे माझे माहेर बनले. माझ्या अंतःकरणात त्यांचे जे स्थान आहे त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दांची श्रीमंती नाही.
अशा माझ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सादर प्रणाम ! त्यांचे यापुढचे आयुष्य सुखी,निरोगी, प्रेरणादायी ठरो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
अनुराधा फाटक. पुणे

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *