ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बहुभाषिक आॅनलाईन कविसंमेलनात माय मराठीचा बोलबाला

July 5, 202112:16 PM 33 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या देशव्यापी राष्ट्रीय बहुभाषिक कविसंमेलनात तब्बल ७० कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवत कविसंमेलन यशस्वी केले. या कविसंमेलनात सर्वाधिक कवी कवयित्रींनी मराठी कविता सादर करीत माय मराठीचाच बोलबाला कायम राहिला तर कोणत्याही भारतीय भाषेचा आम्ही आदरच करतो पण माय मराठीला दुय्यम समजू देणार नाही असा एकूणच कविसंमेलनाचा सूर होता.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे हे होते तर उद्घाटन नवी दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश कर्दम यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. लोकेश कुमार गुप्ता (नवी दिल्ली), कैलास मण्डेला ( राजस्थान), डॉ. आरिफ महात (कोल्हापूर), डॉ. सुशिला टाकभोरे (नागपूर), डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड (मुंबई), डॉ. संदीप सांगळे (पुणे), डॉ. हनुमंत भोपाळे ( नांदेड) हे उपस्थित होते तर डॉ. कविता मीना (कोटा, राजस्थान), डॉ. अशोक पवार (औरंगाबाद), डॉ. आरिफ महाल (कोल्हापूर), डॉ. विक्रम कांबळे ( श्रीगोंदा), डॉ. जगदीश राठोड (अहमदनगर), डॉ. प्रेरणा उबाळे (अनुवादक, पुणे), मधू बावलकर (आदिलाबाद, तेलंगणा), दिव्यांग कवयित्री दीक्षा शर्मा ( कानपूर, उत्तर प्रदेश), सुरजकुमारी गोस्वामी ( हैदराबाद), प्रा. नयन भादुले (लातूर), हनमंत येवले (कर्जत), याडीकार पंजाब चव्हाण ( यवतमाळ), प्रा त्रिशिला साळवे ( धुळे), डॉ. शिवाजी काळे, स्वाती पाटील ( कर्जत) यांची प्रमुख उपस्थिती होती.

साहित्य मंडळाने देशातील सुप्रसिद्ध कवींचे आॅनलाईन पद्धतीने राष्ट्रीय बहुभाषिक महाकविसंमेलन आयोजित केले होते. तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात देशभरातून शिवाजी काळे, मल्हारी कांबळे (कर्नाटक), रिंकी गुप्ता, राजेंद्र खंडेरिया (मुंबई), आनंद जाधव (बिदर), ममता आचार्य (राजस्थान), इंदू रवि (उत्तर प्रदेश), सादिया शेख (पुणे) यांच्यासह एकूण ७० कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कविसंमेलनास प्रारंभ झाला. हे वाचन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी तथा सप्तरंगी साहित्य मंडळाचे महासचिव पांडूरंग कोकुलवार यांनी केले. स्वागताध्यक्ष तथा मुख्य आयोजक डॉ. प्रदीप पंडित यांनी पाहुण्यांचे आॅनलाईन पद्धतीने स्वागत केले. यावेळी डॉ. जयप्रकाश कर्दम, डॉ. कैलास मण्डेला, डॉ. सुशिला टाकभोरे, डॉ. अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कविसंमेलनात कवी कवयित्रींनी कोरोना, महागाई, अंधश्रद्धा, चालीरीती, रुढी परंपरा, खुळचट कल्पना, भ्रष्टाचार, सामाजिक अवडंब या विषयावर आसुड ओढले. तसेच राजर्षी शाहू महाराज, आई, बाबा, निसर्ग, संतश्रेष्ठ सेवालाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवरही कविता सादर करुन कविसंमेलनात चांगलीच रंगत आणली. राजस्थानी, गुजराती, कानडी, बंजारा, हिंदी अशा अनेक भारतीय भाषांतून कविता सादर करुन उपस्थितांना खिळवून ठेवले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम अॅपवरुन आॅनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झालेल्या राष्ट्रीय बहुभाषिक कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अत्यंत ओघवत्या शैलीत प्रा. रेखा गायकवाड आणि मनोहर गायकवाड यांनी केले तर आभार बाबुराव पाईकराव यांनी मानले. झूम अॅपवरुन युट्युब प्रसारण करण्यात आले. संपूर्ण कविसंमेलनाचे तांत्रिक सहाय्य मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालातील उपप्राचार्य डॉ. नंदकुमार चंदन आणि उपप्राचार्य डॉ. बी.डब्ल्यू. गायकवाड यांनी केले. तर सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, सहसचिव कैलास धुतराज, कार्याध्यक्ष मारोती कदम, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, राज्य संघटक प्रशांत गवळे, राज्य समन्वयक बाबुराव पाईकराव, महिला विभाग प्रमुख रुपाली वैद्य वागरे, छाया कांबळे, जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर, महानगर पदाधिकारी भैय्यासाहेब गोडबोले, प्रभारी सुभाष लोखंडे, राजेश गायकवाड, जिल्हा सचिव लक्ष्मण लिंगापुरे, कार्याध्यक्ष गोविंद बामणे, भीमराव ढगारे, दिगंबर श्रीकंठे, रविराज भद्रे, सतिश शिंदे यांनी परिश्रम घेतले. संमेलनपूर्व नोंदणी केलेल्या तसेच कविसंमेलनात सहभाग नोंदविलेल्या सर्व कवी कवयित्रींना सहभागिता प्रमाणपत्र आॅनलाईन पद्धतीनेच देण्यात आले असल्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *