ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ आ.डॉ. वजाहत मिर्झा शनिवार जालना जिल्ह्यात

January 15, 202213:30 PM 47 0 0

जालना (प्रतिनिधी) :  जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, जाफ्राबाद नगरपंचायत निवडणूकीत काँगे्रस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा हे 15 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या निवडणूक प्रचार दौर्‍यावर येत असल्याची माहिती जालना जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यातील बदनापूर येथे सकाळी 10 वा., मंठा येथे दुपारी 1 वाजता आणि जालना येथे दुपारी 3.00 वाजता, जाफ्राबाद येथे सायंकाळी 6.00 वा, निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा, प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा, प्रदेश काँगे्रसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, अ.भा.का. सदस्य भिमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, अनवर बापु देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, आदि मान्यवर उपस्थित राहतील.

याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हा काँगे्रस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, सुभाष मगरे, जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष राहुल देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, जिल्हाध्यक्ष कामगार सफाई सेलच्या नंदाताई पवार, जावेद बेग, विजय जर्‍हाड, शेख शेमशु, नारायण वाढेकर, तालुका काँगे्रसचे अध्यक्ष लक्ष्मण म्हसलेकर, शहराध्यक्ष मोबीन खान, निळकंठ वायाळ, सुरेश गवळी, बबलु भाई, शबाब कुरेशी आदिंनी केले आहे.
डॉ. वजाहत मिर्झा यांचा जालन्यात सत्कार
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्षपदी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची निवड झाल्याबद्दल शहर कॉगे्रस कमिटी आणि जिल्हा काँगे्रस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शनिवारी दुपारी 2.30 वाजता आयेशा लॉन्स (मुक्तेश्‍वर तलावजवळ) पाठक मंगल कार्यालय शेजारी जुना जालना येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *