ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नकोशा मुली झाल्या हव्याशा मुली

November 27, 202113:48 PM 109 0 0

वंशाला दिवा पाहिजे या पूर्वापार चालत आलेल्या विचार सरणीतून मुलगी नकोशी झाली आणि देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या गेली अनेक वर्ष कमी राहिली.मात्र यंदा प्रथमच देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार सध्या एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या १०२० इतकी आहे तर प्रजनन दर घटल्याने लोकसंख्या स्फोट होण्याचा दावा देखील फोल ठरताना दिसत आहे. या सोबतच गर्भ निरोधकांच्या प्रसाराचा दर वाढल्याची सुखद माहिती सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे नकोशी असलेल्या मुली आता हव्याशा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण( एन एच एफ एस) संस्थेने देशातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर, शिक्षण,जन्मदर यासह विविध आकडेवारीचा आपला पाचवा अहवाल बुधवारी २०२०-२१ या कालावधीत दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणानुसार देशात एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या १०२० इतकी झाली आहे. जनगणनेला सुरुवात झाल्या पासून देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक दिसत आहे. या आकडेवारीच्या सत्यतेवर ताज्या जनगणने नंतर शिक्कामोर्तब होईल.विशेष म्हणजे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दर हजारी पुरुषामागे महिलांची संख्या अधिक आहे. शहरा मध्ये हजार पुरुषांमागे ९८५ तर गावांमध्ये १०३८ महिला आहेत. एनएचएफएस च्या २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार १००० पुरुषांमागे महिलांची संख्या ९१९ मुली इतके होते.ते आता ९२९ इतके झाले आहे.

ताज्या सर्वेक्षणानुसार देशात एकूण प्रजनन दर (टी एफ आर)ती फार घटला आहे आधीच्या सर्वेक्षणा नुसार २.२ असलेला प्रजनन दर आता २.० झाला आहे. टीएफआर म्हणजे एक महिला तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते.आंतरराष्ट्रीय पातळीवर टी एफ आर हा २.१ इतका आहे. या दरानुसार लोकसंख्या जैसे थे ‘ राहते. भारतातील प्रजनन दर आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा खाली आला आहे.एनएचएफएसच्या सर्वेक्षणा नुसार देशात गर्भ निरोधकांचा वापर देखील वाढला आहे. गर्भनिरोधकांचा वापर ५७ टक्यावरून ६७ टक्के झाला आहे. देशातील ७०७ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख १० हजार कुटूबांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.या सर्वेक्षणात सात लाख२४ हजार ११५ महिला तर १० लाख १ हजार ८३९ पुरुषांचा समावेश करण्यात आला होता.
लोकसंख्येत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली असली तरी शिक्षणाच्या बाबतीत महिलांची स्थिती चिंताजनक आहे. सर्वेक्षणानुसार देशातील केवळ ७१.५० महिला साक्षर आहेत.४१ टक्के महिलांना दहा वर्षाहून अधिक शिक्षण घेता आले याचा अर्थ ५९ टक्के महिला दहावी पेक्षा अधिक शिकू शकल्या नाहीत. ग्रामीण भागात तर अवघ्या ३३.७० टक्के महिला दहावीच्या पुढे शिकल्या आहेत.अद्याप ३३.३ टक्के महिलापर्यंतच इंटरनेट पोहोचले आहे,तर ५४ टक्के महिला कडे स्वतःचा फोन आहे. २० ते २४ वर्षे वयोगटातील २३.३० टक्के महिलांचे त्या १८ वर्षाच्या होण्यापूर्वीच लग्न झाले आहे.सर्वेक्षणानुसार बालके, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. योग्य पोषण आहार अभावी महिला आणि बालकां मध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते .१९०१ सालच्या जनगणनेनुसार देशात १००० पुरुषांमागे महिलांची संख्या ९७२ इतकी होती. त्यानंतर सातत्याने घसरण होत गेली. स्वातंत्र्या नंतर १९५१ साली करण्यात आलेल्या जनगणनेत हा आकडा घसरून ९४६ वर आला होता.
वरील बातमी वाचून मनास समाधान वाटले.आज पर्यंत केलेल्या दूरदर्शन,आकाशवाणी,एकांकिका , पथनाट्य,लोकनाट्य,चित्रपट,नाटके,प्रसार माध्यमे इत्यादी मुळे लोक जागृती मुळेच वरील प्रमाणे सकारात्मक बदल आपणास पाहवयास मिळत आहे.तरी सुध्दा महाराष्ट्राचा विचार केला तर पाहिजे तेवढा फरक जाणवत नाही.आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे.यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे.
वंशाच्या दिव्या साठी महिलाच आग्रही असतात एकाधीला मुलगी झाली तर त्या घरात असणारी तिची सासू त्या नातीचे स्वागत करीतच
नाही.नातीला उद्देशून सहज म्हणते “आली घर बुडवायला “असे बोलून त्या चिमुकलीचा अपमान करतात. पण या सहज बोलण्यासाठी आपल्या समाजात कारण सुध्दा तेवढीच महत्वाची आहेत. कारण मुलीचे लग्न करताना हुंडा घेतल्या शिवाय तिच्याशी कोणी लग्न करीत नाही.तिचे लग्न होई पर्यंत आई वडीलाला काळजी वाटत असते. आयुष्यभर कमवून सुध्दा लग्नासाठी कर्ज काढावे लागते.कधी कधी जमीन असली तर ती विकावी लागते हुंडा दिल्या शिवाय तीचे लग्न करता येत नाही.
हुंडा दिला नाही तर तिचा सासरी छळ होत असतो.कधी कधी तिला सासरी जीवंत जाळले जाते. मराठी चित्रपट अलका कुबल यांचा पाहिला असेल” लेक चालली सासरला” हे त्याचेच उदाहरण अशी बरीच उदाहरणे समाजात घडत असतात. आणि त्यामुळेच आपल्याला मुलगी नसलेली बरी म्हणून तिचा व तिच्या आईचा छळ करतात. मुलगी म्हणजे डोक्‍यावरचे ओझे समजतात. त्यामुळे मुलगी नसलेलीच बरी अशीच भावना निर्माण होत आहे.त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या महिलांच्या कडून पाऊल उचलले असते याला महिलांच्या बरोबर पुरुष सुद्धा जबाबदार आहेत.मुलगीच झाली म्हणून पत्नीचा खून झालेल्या घटना पूर्वी घडलेल्या आहेतच नव्हेतर आता सुध्दा घडत आहेत. मुलगी ही परक्या घरचे धन असते त्यामुळे पालक तिला शिक्षण सुद्धा मुलासारखे देत नाहीत त्या ठिकाणी सुद्धा फरक केलेला दिसून येतो दुजाभाव ची वागणूक दिली जात असते.त्यामुळेच त्याचे गंभीर परिणाम म्हणजे पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची संख्या कमी होत असते.स्त्रियांची संख्या कमी होण्यासाठी समाज तितकाच जबाबदार आहे. कारण हुंडा बंदीचा कायदा केवळ कागदावरच आहे याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही.
समाजात हुंडा ऐवजी देणगी हा शब्द देणगी हा शब्द वापरला जात असतो. मुलाचे पालक सहज म्हणतात मुलीचे चांगले लग्न करून द्या .येणाऱ्या-जाणाऱ्या ची बसउठ छान झाली पाहिजे.आम्हाला काही दिले नाही तरी चालेल पण तुमच्याच मुलीला तिच्या अंगावर शोभेल असे दागदागिने घालावेत अशी आमची इच्छा आहे.मुलाला तुम्हाला वाटले तर दागिना घाला.पण लग्न मात्र चांगले करून दिले पाहिजे या शब्दातच कितीतरी अप्रत्यक्ष सहज मुलाच्या पालकांकडून मागणी होत असते.येथे जणू काय तोंड बांधून बुक्क्यांचा मार मुलीच्या पालक यांना दीलेचा भास होत असतो.मुलीच्या पालकांची किती तारांबळ होत असेल हे वेगळे सांगण्याची नको यापूर्वी काही मुलींनी पालकाची आर्थिक स्थिती पाहून लग्नाच्या काळजीने आत्महत्या सुद्धा केलेल्या घटनेच्या बातम्या आपण यापूर्वी वाचलेल्या आहेत.वरील सर्व कारणां मुळे मुलगी होवू नये अशीच भावना समाजात निर्माण होत आहे. पण मुलगा झाला की तो वंशाचा दिवा समजला जातो पण मुलगी ही दोन्ही कुटुंबाची म्हणजे माहेर आणि सासरची पणती असते हे मात्र समाज विसरत असतो.”बेटी बचाव बेटी पढाव” ह्या हवेत उडणाऱ्या घोषणा आहेत.त्यासाठी शासनानेच आता त्यावर योग्य दंडात्मक उपाय शोधून काढले पाहिजेत. तरच हंड्या पासून मुलींची सुटका होईल तरच “नकोशा मुली झाल्या हव्याशा मुली” हे म्हणणे सार्थ ठरेल.
लेखक
जी.एस. कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *