ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नारायण माने यांचा धम्म दीप संघातर्फे सत्कार

September 5, 202117:18 PM 9 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार नारायण माने यांचा धम्म दीप संघातर्फे सत्कार करण्यात आला. मोदीखाना भागातील जवाहरलाल नेहरू विद्यालयात रविवारी ( ता. 05) आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. के .बोरूडे हे होते. या वेळी संस्थेचे सरचिटणीस कुसुमाकर पंडित, विश्वस्त रामदास जोहरे, भाजपा महिला आघाडी च्या शहराध्यक्षा श्रीमती क्रांतीताई खंबायतकर, मुख्याध्यापक नागसेन बनकर, श्रीमती जयमाला परदेशी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुसुमाकर पंडित यांनी , दोन दशके जालन्याच्या पत्रकारितेत कार्यरत असलेले नारायण माने यांनी उपेक्षित, वंचित घटकांवरील अन्यायास लिखाणाच्या माध्यमातून वाचा फोडली. तसेच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्व. दादासाहेब बाबुलाल पंडित यांच्या शी असलेला स्नेहभाव त्यांनी पुढे ही कायम ठेवला.असे सांगून त्यांचा नियुक्ती ने जिल्ह्यात पञकार संघ अधिक बळकट होईल. असा विश्‍वास कुसुमाकर पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.

नारायण माने यांनी सत्कारास उत्तर देताना स्व.बाबुलाल पंडित यांच्या आठवणींना उजाळा दिला. कठीण परिस्थितीत गोर-गरिबांच्या पाल्यांसाठी त्यांनी उभी केलेली संस्था आज शिस्तीत व चांगल्या पद्धतीने सुरू असून कठीण काळातही गोर-गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी आशेचा किरण धम्मदीप संघाच्या माध्यमातून दिसत असल्याचे नारायण माने यांनी विषद केले.
सूत्रसंचालन विजयकुमार बोटुळे यांनी केले तर इलियास शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *