ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पिरकल्यान वखारी व माणेगाव केंद्राची NAS कार्यशाळा नंदापुर येथे संपन्न

October 22, 202114:01 PM 22 0 0

नंदापुर येथिल रेणुका माध्यमिक विद्यालयात NAS कार्यशाळा दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता श्री योगेश्वर जाधव हे होते
12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या NAS च्या परीक्षेसाठी 3 री,5 वि, 8 वी व 10 वि ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी कार्यशाळा नियोजनाप्रमाणे आज नंदापुर येथे घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी 80 शिक्षक व मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती होती.

सुरुवातीला आजच्या कार्यशाळेचे आयोजन व रुपरेषा प्रास्तविकात माणेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीअरुण देशमुख यांनी सांगितले त्यानंतर कार्यालयीन सूचना मिशन कवच कुंडल प्रोग्रॅम अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म भरणे Inspired Award साठी विद्यार्थी फॉर्म भरणे या व इतर सूचना तसेच NAS परीक्षेसाठी नेमकी तयारी कशी करावी याबाबत पिरकल्यानं केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजकर सर यांनी खास त्यांच्या शैलीत सर्वांना सूचना दिल्या. श्री खरात सर, अहंकार देऊळगाव यांनी NAS परीक्षा संदर्भात आलेले सर्व PDF व त्यातील योग्य माहिती दिली त्यानंतर OMR शीट सोडवताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात व NAS च्या परिक्षेत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांवर डॉ रेखा कलवले मॅडम यांनी विस्तृत मार्गदर्शन केले
साधनव्यक्ती श्री एस. यु. गायकवाड सर यांनी देखील NAS परीक्षेत विध्यर्थी यांची तयारी कशी करावी हे सांगितले
अधिव्याख्याता श्री योगेश्वर जाधव सर यांनी NAS परीक्षा Framework अध्ययन निष्पत्ती वर कसे प्रश्न सराव करावा तसेच परीक्षा पद्धत या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच स्वाध्याय उपक्रमात जास्तीत जास्त विध्यर्थी यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर व त्यांच्या पूर्ण स्टाफ ने मोलाची मदत केली.
शेवटी प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी व शंका विचारून त्यावर चर्चा करून सर्वांचे समाधान करण्यात आले आभार प्रदर्शन वखारी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री फरताडे सर यांनी केले व कार्यशाळेचा समारोप दुपारी 4.15 मिनिटांनी झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *