जालना / प्रतिनिधी हयुमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना यांच्या संयुक्त विद्यमने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आर. बी. पारवेकर (सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना) तर प्रमुख उपस्थिती अब्दुल रफिक अब्दुल रशीद (अध्यक्ष,हयुमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी जालना ) विधीज्ञ के.ओ.रत्नपारखे, मा.श्री. जे.एस. भूतेकर हे होते.प्रमुख अतिथी म्हणुन अमित कुलकर्णी (संपाक) खुसरो खान (जिल्हा वक्फ अधिकारी पुणे) डेविड घुमारे,(सामाजिक कार्यकर्ता), अमजद खान, डॉ प्रतिक गायकवाड , (चेअरमन,यु.जी.सी. ऑफ इंडिया) यांची उपस्थिती होती.न्यायाधीश आर.बी.पारवेकर यांनी उपस्थित युवकांना भविष्य उज्वल कसा करावाया विषयी मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष अब्दुल रफिक यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगीतले की,युवकांनो तुम्ही देशाची संपत्ती आहे. तुम्ही जर वाईट मार्गाने गेले तर देशाची संपत्ती नष्ट होईल. शिक्षणापासून वंचित राहु नये.
शिकायला वयाची अट नाही, तुम्ही चांगले कामे करा असे मत व्यक्त केले. उपस्थित युवकांना अमित कुलकर्णी,श्री.खुसरो खान,श्री.डेविड घुमारे अमजद खान यांनी युवकांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.प्रतिक गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करतांना इतरांचा चांगला मनाचा कौतुक तेच करतात जे स्वतः मनापासून चांगली आहे.त्यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. अॅड.राहुल चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की, युवकांनो तुम्ही राष्ट्रीय एकतेसाठी व देशाच्या विकासासाठी कामे करा आजच्या काळात यांची गरज आहे असे मत व्यक्त केले. डॉ.प्रतिक विरेंद्र गायकवाड, डॅनियल डेविड घुमारे,मुज्जमिल अब्दुल रहिम कुरेशी,पल्लव अमित कुलकर्णी,मोहम्मद दानिश अब्दुल रफीक,इम्रान खान
मिरअब्बास खान,मोहम्मद गौस मो युसुफ,उजेफ खान अमजद खान,शेख नाजिम शेख जब्बार,सय्यद सईद स. अफसर उजेर शेख गफ्फार ,वजाहत खान वाजेद खान,अफरोज शेख सईद,शेख अरबाज शेख नजिर,आदींची यावेळी उपस्थिती होती. या युवकांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ” राष्ट्रीय युवा आदर्श ” म्हणुन शिक्षण क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र पत्रकार क्षेत्र मानवतावाद क्षेत्र खेळ क्षेत्र मध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना प्रमाण पत्र देवुन सम्मानित करण्यात आले.कार्यक्रमास सुत्र संचालन आर.बी.पारवेकर यांनी केले तर आभार अब्दुल रफीक यांनी मानले.कार्यक्रमाला सफल करण्यासाठी अधिक्षक विधी सेवा प्राधिकरण श्री.असदखान,अन्सारी काशेफ , श्री. देशमुख,वहिद ,दाभाडे मॅडम,शेख असलम यांनी प्रयत्न केले.
Leave a Reply