नांदेड – आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारकार्याचा प्रचार,प्रसार व्हावा तसेच समाजप्रबोधन तथा समाजजागृती घडून यावी यासाठी येत्या रविवारी, २७ जून रोजी नांदेडात आॅनलाईन राष्ट्रीय बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे हे राहणार असून उद्घाटन नवी दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश कर्दम यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. लोकेश कुमार गुप्ता (नवी दिल्ली), कैलास मण्डेला ( राजस्थान), डॉ. आरिफ महात (कोल्हापूर), डॉ. सुशिला टाकभोरे (नागपूर), डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड (मुंबई), डॉ. संदीप सांगळे (पुणे), डॉ. हनुमंत भोपाळे ( नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत तर संपूर्ण कविसंमेलन डॉ. कविता मीना (कोटा, राजस्थान), डॉ. अशोक पवार (औरंगाबाद), डॉ. आरिफ महाल (कोल्हापूर), डॉ. विक्रम कांबळे ( श्रीगोंदा), डॉ. जगदीश राठोड (अहमदनगर), डॉ. प्रेरणा उबाळे (अनुवादक, पुणे), मधू बावलकर (आदिलाबाद, तेलंगणा), दीक्षा शर्मा ( कानपूर, उत्तर प्रदेश), सुरजकुमारी गोस्वामी ( हैदराबाद), प्रा. नयन भादुले (लातूर), हनमंत येवले (कर्जत), याडीकार पंजाब चव्हाण ( यवतमाळ), प्रा त्रिशिला साळवे ( धुळे), डॉ. शिवाजी काळे, स्वाती पाटील ( कर्जत) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. प्रदीप पंडित, संयोजन समितीचे अध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी दिली.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त शहरातील कविमित्रांच्या पुढाकाराने गुगल मीटच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने राष्ट्रीय बहुभाषिक कविसंमेलनात देशभरातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन झाल्यानंतर कविसंमेलनास प्रारंभ होणार आहे. संयोजन समितीच्या वतीने कोणत्याही भारतीय भाषेमध्ये कविता सादर करण्याबाबत कळविले असून त्याआधी आपली स्वरचित कविता २५ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत व्हाटसप 96657 11514 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व सहभागी कवी कवयित्रींना आॅनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कविसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रा. रेखा गायकवाड, मनोहर गायकवाड, बाबुराव पाईकराव, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, छाया कांबळे, रणजीत गोणारकर, भैय्यासाहेब गोडबोले, सुभाष लोखंडे, राजेश गायकवाड, लक्ष्मण लिंगापुरे, गोविंद बामणे, भीमराव ढगारे, दिगंबर श्रीकंठे, रविराज भद्रे, सतिश शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.
Leave a Reply