ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इंधन दरवाढ निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

October 21, 202114:52 PM 22 0 0

जालना (प्रतिनिधी) : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जालना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज दि. 20 रोजी गांधी चमन परिसरात गॅस सिलेंडर हातगाडीवरती घेवून धिंड काढून आंदोलन करण्यात आले आहे. देशात पेट्रोल व डिझेल दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना पोहोचत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीशी सामना करत असताना दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार महागाईमध्ये वाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना आणखी वाढ करत आहे. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य आधीच अडचणीत असताना इंधनाची दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. 

पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असतांनाही केंद्र सरकार यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन व निदर्शने करून केंद्र सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दवाढ तात्काळ मागे न घेतल्यास  संपुर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी यावेळी बोलतांनी दिला. यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण यांनी केंद्र सरकारचा अक्रमक होत तीव्र निषेध करत  ते म्हणाले की, केंद्र सरकारने भुल थापा देत जनतेचा विश्‍वासघात केला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबलु चौधरी, माजी उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ॲड. संजय काळबांडे, ज्ञानेश्‍वर धानुरे, कुणाल क्षीरसागर, दशरथ तोंडूळे, रहिमान शेख, कैलास शंकरपल्ली, किरण जाधव आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *