ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवघर आरोग्य उपकेंद्र मागील २० वर्षांपासून बंद : कौलारू इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड: सेनेचा उपोषणाचा इशारा

August 19, 202116:13 PM 36 0 0

उरण ( संगिता पवार ) उरणच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले नवघर आरोग्य उपकेंद्र मागील २० वर्षीपासून बंदच आहे.बंद पडलेल्या दयनीय अवस्थेतील आरोग्य उपकेंद्रामुळे गरीब-गरजू रुग्णांना उपचारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही उपकेंद्राची दूरुस्ती झालेली नाही.यामुळे संतप्त झालेल्या सेनेच्या राजिप सदस्य विजय भोईर यांनी कामचुकार शासकीय अधिकाऱ्यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा रायगडच्या पालकमंत्री आदित्य तटकरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


उरण तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड ते दोन लाख आहे. उरण परिसरात आंतरराष्ट्रीय उद्योग धंदे असल्याने रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या कामगारांमुळे लोकसंख्येत कमीत कमी आणखी दीड लाखाची भर पडली आहे.तालुक्यात असणारे कोप्रोली येथील आरोग्य केंद्र व त्यावर अवलंबून असणारे सहा उपकेंद्र व त्यातही मुख्यतः असणारे चार उपकेंद्रापैकी जासई, चिरनेर, विंधणे अद्यापही अद्यावत नाहीत.तर
नवघर येथील आरोग्य उपकेंद्र मागील वीस वर्षांपासूनच बंद पडलेले आहे.याआधी या नवघर आरोग्य उपकेंद्रामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या.मात्र आरोग्य उपकेंद्र बंद पडल्यापासून गरीब गरजू- रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.
वापरच बंद झाल्याने नवघर उपकेंद्राची कौलारू इमारत जमीनदोस्त झाली आहे.शासकीय आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे इमारत सांडपाण्याचे गटार बनले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
कोवीड दरम्यान उरण परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती.तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणातही वाढतच
चालली होती.या दरम्यान नवघर आरोग्य उपकेंद्राची उणीव सर्वांनाच भासत होती.नवघर उपकेंद्राची व वैद्यकीय सुविधेची आवश्यकता असताना देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले आहे.

मागील तीन वर्षांपासून नवघर आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राजिपच्या सर्वसाधारण सभा व आरोग्य सभेमध्येही याबाबत आवाज उठविला होता.सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीओ डॉ. किरण पाटील यांनी या उपकेंद्राची पाहणी करून अत्यंत दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर तातडीने आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.परंतु आजतागायत या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहेत. कामचुकार अधिकारी याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देताना दिसत नाहीत.यामुळे कामचुकार शासकीय अधिकाऱ्यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा रायगडच्या पालकमंत्री आदित्य तटकरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *