ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’, तांडेल मैदानात गर्दी जमायला सुरुवात, पोलिसांचा कडक बंदोबस्त

June 24, 202112:44 PM 56 0 0

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.

तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात
नवी मुंबईच्या तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली आहे. विरारहून बस, ऑटो, गाड्यांमधून झेंडे आणि फलक घेऊन कोळी-आग्री बांधव दाखल झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले आहेत. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले आहेत.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

आंदोलन परिसर गजबजला
आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हातात दि.बा पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी दि.बा पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी होत आहे.

आंदोलनस्थळी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलीय. एल्गार स्टेजच्या शेजारीच महिलांनी वडाच्या झाडाला फेरे मारले. यावेळी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्याचं महिलांनी साकडं घातलंय.

सरकारला आमची ताकद दाखवू, आंदोलनकर्त्यांचा इशारा
नवी मुंबई पाम बीच रोडवर गाड्यांची ये जा वाढलेली पाहायला मिळतीय. मुंबई, पालघर, विरार, ठाणे वसई या ठिकाणच्या गाड्या गणपतराव तांडेल मैदानाच्या दिशेनं येण्यास सुरवात झाली आहे. आग्री कोळी समाजाला पाठिंबा देण्यासाठी गणेश पाटील आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारला आज समाजाची ताकत दिसेल, त्यानुळे येत्या काळात सरकारने सावध राहावं असा इशारा त्यांनी दिला आहे.

वाहतुकीत कोणते बदल
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलिस प्रशासनानं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत
एनआरआय सिग्नलकडून पुढे वाहतूक बंदचे फलक लावण्यात आले आहेत
नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक सकाळी आठ ते रात्री आठ बंद…
तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत….
मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे…

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *