ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे.एन.पी.टी.ब्रिजखाली चोरीची रिक्षा विक्री करणारे दोन चोर नवी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात.

August 7, 202113:46 PM 7 0 0

उरण  प्रतिंनिधी  (संगीता सचिन ढेरे)  : जे.एन.पी.टी. येथील ब्रिजखाली अनेक वहाने उभी असतात. आणि याच ठिकाणी बुधवारी चोरीची रिक्षा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरांना नवी मुंबई पोलिसांनी त्यांनी चोरी केलेली रिक्षा ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.


अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे संदिप किशन रिडला,आणि किशोर संतु राठोड अशी आहेत. या चोरांकडून सुमारे १ लाख ४ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
काही इसम हे जे.एन.पी.टी. ब्रिजखाली रिक्षा घेण्यासाठी येणार आहेत अशी खबर नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला आणि या दोन चोरांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते चोरीची रिक्षा विक्री करण्याच्या उद्देशाने आले होते हे सिद्ध झाले यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *