मुरूड जंजिरा (प्रतिनिधी, सौ नैनिता कर्णिक) रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे मुरूड गावात वेशीवर श्री कोटेश्र्वरी मातेचे मंदिर आहे. ही माता कोट्यातून म्हणजे कासा किल्लातून मुरूड जंजिरा या गावी आली म्हणून या देवीचे नाव कोटेश्र्वरी असे पडल्याची आख्यायिका आहे. यावर्षी शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले झाले. श्री कोटेश्र्वरी मंदिरात नवरात्रोत्सवात मंदिर सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत उघडे असते.
देवीला दररोज भाविकांनी अर्पण करण्यात आलेली साठी परिधान केली जाते. देवीला साडी नेसवण्याचे सेवाकार्य सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ ऊषा खोत व सालकरी गुरव महिला करतात.या दिवसात देवी अलंकारांनी सजवितात.दररोज देवीची आरती करण्यात येते.देवीचा सर्व कारभार श्री कोटेश्र्वरी देवस्थान ट्रस्ट मरूड तर्फे पाहिला जातो.यंदाही कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले आहे असे श्री कोटेश्र्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक उपाध्यक्ष मनोहर गुरव, कार्यवाह सुभाष पाटील, खजिनदार नारायण पटेल यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ उत्तम प्रकारे सहकार्य करतात.
Leave a Reply