ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रवादी हा सर्वसामान्यांचा पक्ष – टोपे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन

July 12, 202113:46 PM 25 0 0

जालना । प्रतिनिधी – राष्ट्रवादी हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केले. जालना शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन रविवार (दि 11) रोजी करण्यात आले उद्घाटनानंतर आयोजित सभेत त्या प्रसंगी श्री टोपे बोलते होते. यावेळी रा.काँ. जालना शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाह आलम खान, युवक राष्ट्रवादीचे जालना शहराध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलतांना श्री टोपे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या कुटूंबाला प्राधान्य देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या कुटूंबियांची काळजी घेतली तर कोरोनावर मात करण्यास मदत होईल. राष्ट्रवादी पक्षात जाती-धर्माला थारा नाही, हा पक्ष सर्व धर्म-जात-पंथ-समाजाला सोबत घेऊन चालणारा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. तसेच जालना शहरात पाण्याची बिकट समस्या होती. जालना-जायकवाडी ही जलवाहिनी माझ्या कार्यकाळात मंत्री असतांना मंजूर झाली असल्याचेही श्री टोपे यांनी याप्रसंगी सांगितले.
जालना शहरातील प्रभाग 12 मधील दुखीनगर, मिल्लत नगर, नहादी कॉलनी या परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सय्यद रहीम, नगरसेवक जयंत भोसले, नगरसेवक फारुख तोंडीवाले, माजी नगरसेवक अन्वर बेग, अ‍ॅड. संजय काळबांडे, अर्शद खान पठाण, रईस कॅप्टन, रिजवान बागवान, शाहरूख खान, बाळू कोकणे, अब्दुल गौस, आमेर सिद्धीकी, तय्यब देशमुख यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.
प्रसंगी शाखा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवक काँग्रेस जालना शहराध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार अन्वर बेग यांनी मानले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विस्तारावर भर – प्रा. राजेंद्र जाधव
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विस्तारावर भर देणार असल्याचे युवक शहराध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी हा जनसामान्यांचा पक्ष आहे. शहरातील युवकांना राष्ट्रवादी या एका छताखाली आणून पक्षाचा विस्तार शहरभरात करणार आहे. युवकांची मोठी फळी राष्ट्रवादीत आहे. युवकांमुळेच राष्ट्रवादी बळकट आहे. शहरातील युवकांनी आपल्या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा स्थापन करून पक्षात सहभागी होण्याचे आवाहनही प्रा. जाधव यांनी युवकांना उद्देशून केले. तसेच 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरु झाले असून प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *