अंकुशनगर / शहागड ( प्रतिनिधी) : केंद्र सकारकडून सातत्याने होत असलेल्या गॅस सिलिंडर व इंधन दर वाढविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या तथा अंबड तालुकाध्यक्ष नितु संजय पटेकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी ( ता.०७) अंकुश नगर येथे रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष रुपलीताई चाकणकर यांच्या निर्देशानुसार व ना. राजेश टोपे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंकुशनगर, ता.अंबड, जि. जालना येथे सौ. नितु संजय पटेकर, यांच्या सह परिसरातील महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
Leave a Reply