ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अनावश्‍यक खर्चाला फाटा देण्यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याची गरज : आ. कैलास गोरंट्याल

December 14, 202120:55 PM 35 0 0

जालना (प्रतिनिधी) : वाढती महागाई आणि विवाह समारंभावर होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देण्यासाठी राहत सोशल ग्रुप जालना तर्फे गेल्या वीस वर्षापासून राबविण्यात येत असलेला मुस्लीम समाज सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम अत्यंत कौतूकास्पद आहे. अशा प्रकारचे उपक्रम सर्व समाजाने राबविण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केले. राहत सोशल ग्रुप तर्फे आज रविवार दि. 12 डिसेंबर रोजी मंठा चौफुली जवळील सिटी लॉन्स येथे आयोजीत करण्यात आलेल्या मुस्लीम समाज सामुहिक विवाह सोहळ्या प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी मुस्लीम सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहमंद फेरोज सौदागर, माजी नगरसेवक अय्युबखान, रियाजभाई, अफरोजभाई, शेर जमाखान, अ. करीम बिल्डर, जिशान खान, शेख रियाज, अमेर खान, शेख मुश्‍ताक, सरपंच भाऊलाल पवार, अभय यादव, मोहन इंगळे, सय्यद अजहर, साईनाथ चिन्नादोरे, सय्यद अब्दुल वहिद, इंजि. सय्यद शोईल, मुख्याध्यापक मोहमंद हानिफ, विकास बागडी इत्यादींची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपल्या भाषणात आ. गोरंट्याल यांनी राहत सोशल गु्रपच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे सुरू ठेवलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या वाढत्या महागाईमुळे समाजातील गोर गरीब लोकांना विवाह सोहळ्यावर होणारे खर्च परवडणारे नाहीत. अनावश्‍यकपणे होणारा खर्च आणि विवाह सोहळ्यासाठी होणारी दगदग थांबविण्यासाठी राहत सोशल गु्रपच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक विवाह सोहळ्याचा राबवलेला उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून इतर समाजाने देखील या कार्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्‍यकता असल्याचे मत आ. गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केले. तत्पुर्वी मुफ्ती अनिसुर रहेमान यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नवविवाहीतांना शुभेच्छा देत राहत सोशल गु्रपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रस्ताविक व संचलन गु्रपचे संस्थापक सचिव लियाकत अली खान यासेर आणि डॉ. सलिम नवाज हशर जाफराबादी यांनी केले तर आभार डॉ. जफर एकबाल यांनी मानले.
या सामुहिक विवाह सोहळ्यात एकुण सात मुस्लीम जोडपे विवाहबध्द झाले. विवाह सोहळ्याच्या अनुषंगाने करोना काळात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. सी. डी. मोजेस, डॉ. शोभा मोजेस, डॉ. जफर एकबाल, डॉ. अब्दुल अजिम, डॉ. राशेद अली खान, डॉ. सैय्यदा सना, डॉ. अशिष राठोड, डॉ. अब्दुल हमिद, डॉ. शोईब, डॉ. दिपक रसाळ यांचा राहत सोशल ग्रुपतर्फे आ. कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते शाल-श्रीफळ, पुष्पहार व स्मृती चिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हाफिज सय्यद असरार यांनी कुरान पठण केले आणि पैगंबर मोहंमद (सल) नात सादर केली. त्यानंतर काजी सय्यद नुरूद्दीन आणि काजी बिलाल यांनी निकाहाची कारवाई पार पाडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहत सोशल ग्रुप जालनाचे शेख अफसर शेखजी, संस्थापक सचिव लियाकतअली खान यासेर, शेख सलिम शेख मोहमंद, सय्यद अख्तर, सलिम यासीनखान पठाण, सईद जहागीरदार, फईम शेख, अहेमद जहागीरदार, शेख महेबुब, सय्यद शाकेर, शेख सलिम कॉन्ट्रेक्टर, अम्मार यासीर, शेख सोनु, शेख उसाम, शेख इम्रान, जावेद तांबोळी, खिजर फारूख यांनी परिश्रम घेतले. काजी नुरोद्दीन यांनी दुआ करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *