राणंद,ता.18 पिंपरी ता माण येथील जिल्हा परिषद शाळा पिंपरी येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यासाठी पालकांची विशेष सभा विदयमान अध्यक्ष सोनाजी राजगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.प्रशासकीय अधिकारी म्हणून कुकुडवाड बिट च्या शिक्षण विस्तार अधिकारी संगिता गायकवाड उपस्थित होत्या. समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य तसेच पालकांच्या उपस्थितीत शासनाच्या परिपत्रकाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत पालकांमधून पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष यांची शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून बहुमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायत नियुक्त सदस्य म्हणून श्री गुलाब सखाराम राजगे तर शिक्षण तज्ञ म्हणून आप्पासो नामदेव राजगे यांची नियुक्ती करण्यात आली.
निवडलेल्या सदस्यांमधून श्री नेताजी सावबा राजगे यांची अध्यक्ष म्हणून तर श्री दादासाहेब गणपत राजगे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पालकांमधून सदस्यपदी निवडण्यात आलेले सदस्य पुढीलप्रमाणे ,श्री . आकाराम आण्णा राजगे,श्री. नारायण निवृत्ती राजगे ,सौ. पूजा दादा राजगे,सौ संगिता विजय अहिवळे, सौ.अफसाना हारुण मुलाणी,सौ. पार्वती महादेव माने,सौ मंगल रायबा बुधावले ,शिक्षक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ छाया अशोक फरकुटे ,विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रेया राजेंद्र जाधव व प्रविण पोपट माने यांची निवड करण्यात आली. सदर शाळा व्यवस्थापन समिती ही पुढील दोन वर्षांसाठी कार्यरत राहील सचिव म्हणून मुख्याध्यापक श्री.दाजी भगवान गोरड हे कामकाज पाहतील. नवनियुक्त सदस्यांचे आणि विदयमान शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संगिता गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नेटके नियोजन सौ सुरेखा डोईफोडे ,सुवर्णा माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरजकुमार निकाळजे यांनी तर आभार प्रदर्शन श्री अविनाश शिंदे यांनी मानले.
Leave a Reply