ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नेताजी सुभाषचंद्र बोस सेनाच्या वतिने गरीब मुलींच्या लग्ना करीता अर्थसहाय्य

March 21, 202217:07 PM 28 0 0

जालना/प्रतिनिधि : नाशिक येथील धाञक फाउंडेशन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सेना यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यभरातील गोरगरीब मुलींच्या लग्ना करीता ५० हजार रुपयाची कन्या सेवा साह्य मुदत ठेव पावतीच्या माध्यमातुन मदत केल्या जात असुन गेल्या आठ दिवसात असंख्य नववधुंना रोख रक्कम व मुदत ठेव पावती दिल्या जात असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी दिली आहे.
शहरातील अंबड रोडवरील मातोश्री लाॅन्स च्या पाठीमागे असलेल्या संस्थेच्या कार्यालयात ही मदत वितरीत केल्या जात आहे.आज घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील निलोफर सुभान पठाण, शहरातील शिवानी संजय हरदेकर आणि सोनाली राजेश हरदेकर या मुलींचे उद्या आणि परवा लग्ण असुन यांनी कन्या सेवा साह्य मुदत ठेव योजने करीता संस्थे कडे अर्ज दाखल केले होते,त्यानुसा या तीन्ही मुलींना आज शनिवारी नेताजी सुभाष चंद्र बोस सेनाचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या हस्ते या नववधुंना प्रत्येकी रोख दहा हजार रुपये व मुदत ठेव पावती दिली आहे।

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *