ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण प्रवेशध्दाजवळील चारफाटा सर्कल रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व सुशोभीकरण

May 27, 202220:19 PM 47 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चार फाटा सर्कल रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे असे आदेश रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाला दिले. सिडकोच्या अधिकारी वर्गाने तात्काळ पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून उरण चार फाटा सर्कल रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम में पी.पी.खारपाटील कंपनीच्या माध्यमातून हाती घेतले आहे.
उरण चार फाटा सर्कल रस्त्याचे काम हे मागील वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात प्रवाशी नागरीक,वाहन चालक याना अनेक समस्यांचा सामना करत प्रवास करावा लागणार आहे.तरी सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सिडकोने हाती घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली. या संदर्भात नुकताच उरण चार फाटा सर्कल रस्त्याकडे सिडकोचे दुर्लक्ष अशा प्रकारचे वुत्त वुत्तपत्रात प्रसिध्द करण्यात ही आले होते.त्याची दखल रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन सिडकोने पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे असे आदेश जारी केले.
खासदार सुनील तटकरे व जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून सिडकोने तात्काळ उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चार फाटा सर्कल रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.सदर रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम हे नवीमुंबई परिसरातील नावाजलेली मे.पी.पी.खारपाटील कंपनी करत असल्याने प्रवाशी नागरीक,वाहन चालक यांनी समाधान व्यक्त करुन पालकमंत्री अदितीताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, सिडको अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *