ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर, येत्या 21 मार्चला परीक्षा

March 12, 202116:07 PM 13 0 0

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

काल नेमकं काय घडलं
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
पुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *