जालना/प्रतिनिधी भीम आर्मी संघटनेतर्फे 3 फेब्रुवारी रोजी जालना शहरातील हॉटेल मधुबनमध्ये नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेची नवीन कार्यकारिणी भीम आर्मीचे प्रदेश संघटक रंजीत माने यांच्या सूचनेनुसार 8 फेब्रुवारी रोजी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी दिली.
सत्कार कार्यक्रमात बोलतांना जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी जालना शहर व जिल्ह्यात भीम आर्मी संघटना गोरगरीब, पिडीत, अन्यायग्रस्त व्यक्तींच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून, त्यांना न्याय देण्यासाठी लढत आहे. भीम आर्मीच्या शाखा गावागावात, वाडी वस्तीवर करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी भीम आर्मीचे जिल्हा सल्लागार एम.यु. पठाण, जिल्हा मार्गदर्शक ए.के. पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष आर.बी. शिंदे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणूकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड.संतोष मोरे, अॅड. सौ.मीराताई महस्के पाटील, विलासराव जाधव,प्रा. रामजी जोंधळे, सौ.मंगलाबाई जाधव,अॅड. गोडबोले, पॅनेल प्रमुख अशोक पाडमुख, परमेश्वर मोरे यांच्यासह भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.यु पठाण यांनी केले.
Leave a Reply