अष्टभुजा हिरकणी, साप्ताहिक आपल्या हाती देताना मनस्वी हर्ष होत आहे. विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने हे साप्ताहिक नवी उमेद घेऊन उभी आहे.
आज समाजात सर्वत्र विविध वाईट प्रव्रतीला उधाण आलं आहे. महिला आणि मुलींवर लैंगिक शोषण तसेच अत्याचार हे दिवसागणिक वाढतच जात आहे. हा सर्वच प्रकार प्रचंड निंदनीय आहे. आशा प्रकारा मुळे भावी पिढी आणि समाज बिघडत चालला आहे. याचबरोबर मानवाला नितीमुल्यांचा विसर पडत आहे. हि ह्रदयद्रावक चाल आपण महिला साहित्यिकांनी विचारविनिमयातुन हाणून पाडली पाहिजे आणि सामाजात महिलांवर होणार्या अत्याचारवर वाच फोडली पाहिजे. तेव्हा कुठे समाज जागा होईल.
एकीकडे होणारे अत्याचार आणि दुसरीकडे स्त्रिया ना वावरताना होणारी घालमेल आशी आहे की, सांगता ही येत नाही आणि दाखवता ही येत नाही आशा परिस्थिती त काही महिला धाडस करू आपली प्रतिमा ऊंचावतात आणि झळकवतात . ह्या आश्या नारी जातीचा सन्मान या साप्ताहिकातुन प्रत्यक्ष पणे केला जाणार आहे. अष्टभुजा हिरकणी साप्ताहिक हे प्रत्येक महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यसपीठ देण्यात यशस्वी ठरत आहे. हे साप्ताहिक सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, हिच अपेक्षा.
धन्यवाद !
सौ.रूचिरा बेटकर
मुख्य कार्यकारी संपादक, नांदेड.
Leave a Reply