ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अमिन पठाण यांना नवयान जीवनशिक्षण पुरस्कार

December 14, 202120:56 PM 44 0 0

नांदेड – जिल्हा परिषद अंतर्गत सोनखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अमिन वजीरसाब पठाण यांना नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणारचा ‘नवयान जीवनशिक्षण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, सन्मानचिन्ह, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप असून पठाण यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदरील पुरस्कार २७ डिसेंबर रोजी गोणार येथे होत असलेल्या पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित गोणारकर यांनी दिली.

या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नवयान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अमिन पठाण यांनी आपली शैक्षणिक सेवा १९८४ पासून लोहा तालुक्यातील हरसद येथून केली. दगडगाव त्यानंतर कंधार तालुक्यातील आलेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कर्तव्यकठोर सेवा बजावली. केंद्रप्रमुख या पदावर कोसमेट, बारुळ, सा.का. गांधीनगर येथे कार्य केले. सद्या ते शिक्षण विस्तार अधिकारी असून त्यापूर्वी शेवडी बा., सोनखेड, सा.का. गांधीनगर या तिन्ही केंद्राचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. पठाण यांना १९९७ साली तालुका गुरुगौरव, २००० साली जिल्हा गुरुगौरव तर २००४ साली राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *