ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

काँग्र्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष शेख वसीम यांचा सत्कार

March 9, 202212:21 PM 27 0 0

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख तर जालना विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख वसीम यांची निवड झाल्याबद्दल जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 8 मार्च मंगळवार रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
जालना विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात शेख वसीम उतरले होते. त्यांचा या पदासाठी विक्रमी मतांनी विजय झाला आहे. जालना जिल्हा युवक काँग्रेसची निवडणुक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. नवनिर्वाचित युवक काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आ. कैलास गोरंट्याल यांचे मार्गदर्शन लाभले होते. जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना विधानसभा युवक काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष शेख वसीम त्यांचे सहकारी पदाधिकारी विधानसभा सचिव शेख मुजाहेद, इम्रान बिल्डर, शेख करीम लोहार बिल्डर यांचा मंगळवार रोजी शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक सय्यद अजहर, शेख शकील, डॉ. विशाल धानुरे, सय्यद करीम बिल्डर, गणेश चांदोडे, चंद्रकांत रत्नपारखे, बाबासाहेब वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील जुनेद खान यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाली असून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ॲड. देवराज डोंगरे, बदनापूर विधानसभा अध्यक्षपदी दिपक कायंदे, परतूर विधानसभा अध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे, घनसावंगी विधानसभा अध्यक्षपदी दिपक कोरडे, भोकरदन विधानसभा अध्यक्षपदी महेश दसपुते या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात येते आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *