उरण ( संगिता पवार ) रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांची रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली. त्या प्रसंगी उरण तालुक़ा लोहार समाज कमिटी चे सर्व पदाधिकारी यांनी सदिच्छा भेंट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उरण तालुक़ा लोहार समाज कमिटीचे अध्यक्ष राहुल कोशे, उपाध्यक्ष . कृष्णा व्यापारी, सदस्य श्री. चंद्रकांत जोशी, श्री. प्रवीण कोशे, श्री. अनिल जाधव, श्री. प्रवीण जोशी, श्री. राजु जाधव तसेच सदस्या सौ. पुर्वी कोशे, सौ. लतिका खंडागले, सौ. नयना कोशे उपस्थित होते.
सदर प्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरतसाहेब यांनी उरण तालुक़ा लोहार कमिटीच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आभार व्यक्त केले, तसेच उरण तालुक़ा लोहार समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Leave a Reply