धुळे : धुळ्यात एका नवदाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील बळसाणे इथे लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे आणि त्याची पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे शेताची काम उरकत होते. यावेळी पतीला पिण्याचं पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू विहिरीतून पाणी काढताना तिचा तोल गेला. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही विहिरीत उडी मारली.
परंतु विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघे जण तळाला गेल्या आणि या नवदाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
Leave a Reply