ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अपघाती निधन झालेल्या मृताच्या व नातेवाईकांच्या शोधात न्हावाशेवा पोलिस

October 1, 202113:40 PM 23 0 0

उरण (संगिता पवार) उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 28 जून 2021 रोजी पहाटे 3 : 20 वाजताचे आगोदर जेएनपीटी बंदर परिसरातील चांदणी चौकाजवळ बंदर उपभोगता भवन (पि.यु.बी.) इमारती ते सोनारीकडे जाणाऱ्या रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन बेदरकारपणे व भरधाव वेगाने चालवून अनोळखी इसम अंदाजे 30 ते 35 असून, या इसमास ठोकर देऊन,त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत करून अपघाताची माहिती पोलिसांना न देता व जखमीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता निघून जाऊन त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे.


याबाबत न्हावाशेवा पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 279,304(अ) सह मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 184,134(अ),(ब),177 नुसार पोलिस नायक राहुल पांडुरंग पाटील यांनी सदर दुर्घनेची फिर्याद दाखल केली आहे.मात्र 3 महिन्यांपासून सदर अनोळखी मृत इसमाचा व त्याच्या नातेवाईकांचा शोध न्हावाशेवा पोलिसांकडून सुरू आहे. रंग सावळा,उंची अंदाजे 165 सेमी,अंगात नेसून लाल रंगाचा शर्ट दोन्ही हातामध्ये दुमडलेला,पायात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट,पॅन्टच्या खिशामध्ये काळ्या रंगाचा व लाल कापडी रंगाचे दोन मास्क,खिशात काळ्या रंगाचा तुटलेला चस्मा,अंगात निळ्या रंगाची लॅक्स व्हेनिस कंपनीची अंडरवेअर,लाल रंगाची पावसाळी आर टाइम कंपनीची पावसाळी चप्पल असे सदरच्या अपघाती निधन झालेल्या व्यक्तीचे वर्णन आहे.
सदर इसमाचे नातेवाईक आपणांस माहिती असल्यास नवी मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत उरण तालूक्यातील प्रसिद्ध रतनेश्वरी देवीचे मंदिर असलेल्या जसखार गावचे पश्चिमेस न्हावाशेवा पोलिस ठाणे आहे.त्यामुळे याबाबतीत माहिती मिळाल्यास न्हावाशेवा पोलिस ठाणे दूरध्वनी क्र.022-7224282 व 02227471012 वर संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भटे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *